Mumbai Mhada Lottery Saam Tv
मुंबई/पुणे

MHADA Lottery: गुड न्यूज! मुंबईत घ्या हक्काचे घर, म्हाडाकडून ३,५०० घरांची लॉटरी; कुठे किती घरं?

Mumbai Mhada Lottery 2026: मुंबईमध्ये म्हाडाकडून ३५०० घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. ही घरं मुंबईतील गोरेगाव, विक्रोळी आणि प्रतीक्षानगर येथे असणार आहेत. कुठे किती घरं असणार आहेत ते घ्या जाणून...

Priya More

Summary -

  • म्हाडाकडून मुंबईत ३,५०० घरांची लॉटरी निघणार आहे

  • गोरेगाव पत्राचाळ, कन्नमवारनगर आणि सायनच्या प्रतीक्षानगर येथे ही घरं असणार आहेत

  • मध्यम आणि अल्प उत्पन्न गटाला मोठा दिलासा

  • अॅडव्हान्स काँट्रिब्युशन स्कीम अंतर्गत घरांची उभारणी होणार

मुंबईमध्ये हक्काचे घर असावे असं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईमध्ये गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ म्हणजे म्हाडाकडून ३,५०० घरांची लॉटरी काढण्यात आली आहे. त्यामुळे मध्यम उत्पन्न गटाला दिलासा मिळाला आहे. मुंबईमधील प्राईम लोकेशनवर ही घरं असणार आहे. अगदी स्वस्तामध्ये मुंबईकरांना ही घरं खरेदी करता येणार आहेत. आतापर्यंत तयार घरांची लॉटरी काढणारे म्हाडा आता अॅडव्हान्स काँट्रिब्युशन स्किमअंतर्गत घरे तयार करणार आहे.

म्हाडाच्या या लॉटरीमधील घरं गोरेगाव पत्राचाळ, विक्रोळीतील कन्नमवारनगर आणि प्रतीक्षानगर या तीन ठिकाणी असणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये म्हाडाकडून ही लॉटरी काढली जाणार आहेत. ही घरं असलेल्या प्रकल्पांना आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्या असून, प्राथमिक स्तरावर काम सुरू देखील करण्यात आले आहे. सर्वात जास्त घरं ही गोरेगावच्या पत्राचाळीत आहेत. गोरेगावच्या पत्राचाळमध्ये २,९५० घरं, कन्नमवारनगर आणि सायनच्या प्रतीक्षानगरमध्ये ६०० घरं असणार आहेत.

सध्या ज्या इमारतींची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. त्या घरांचा लॉटरीत समावेश केला जातो. पण म्हाडाकडे मुंबईत पुरेशी तयार घरे उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे मार्च-एप्रिलमध्ये मुंबई मंडळाकडून काढल्या जाणाऱ्या लॉटरीत अॅडव्हान्स काँट्रिब्युशन स्किमअंतर्गत उभारल्या जाणाऱ्या घरांचा समावेश केला जाणार आहे.

गोरेगावच्या पत्राचाळमध्ये असणाऱ्या २,९५० घरांपैकी २५० घरं ही उच्च उत्पन्न गटासाठी असणार आहेत. मध्यम उत्पन्न गटासाठी १,७०० तर अल्प उत्पन्न गटासाठी १,००० घरं असणार आहेत. कन्नमवारनगर आणि प्रतीक्षानगर या दोन्ही ठिकाणी ६०० घरे असणार असून ही घरं मध्यम उत्पन्न गटासाठी असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : १२ वीच्या विद्यार्थ्याची मॉलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: नाशिकच्या म्हाडा घोटाळा प्रकरणात पहिली अटक, सोनू मनवाणीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Saibaba Temple: साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळला, ७ जण गंभीर जखमी

Crime News : गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडला ₹६०० त रूम दिली, नंतर दोघांनी डाव रचला; १६ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार

Sunil Gavaskar: ...हे भारतीयांच्या हत्येत योगदान दिल्यासारखंच! सुनील गावस्करांची काव्या मारनवर अप्रत्यक्ष टीका

SCROLL FOR NEXT