Mumbai Local Train Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train: आनंदाची बातमी! पनवेलवरून थेट बोरीवली- विरारला जाता येणार, लोकलसेवा कधीपासून होणार सुरू?

Panvel- Virar Local News: पनवेलवरून बोरिवली आणि विरारसाठी प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच पनवेलवरून थेट बोरिवली आणि विरारसाठी लोकल सुटणार आहे. वाचा सविस्तर...

Priya More

लोकल प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पनवेलवरून बोरीवली आणि विरारसाठी प्रवास करणाऱ्या आणि बोरीवली- विरारवरून पनवेलसाठी प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण आता पनवेलवरून थेट बोरीवली- विरारला जाता येणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने ‘एमयूटीपी ३ ब’मध्ये पनवेल-वसई उपनगरी रेल्वे प्रोजेक्टचा समावेश करण्यात आला आहे. पनवेल-वसई लोकल धावल्यानंतर येत्या काही दिवसांत त्याचा विस्तार बोरिवली- विरारपर्यंत करणे शक्य होणार आहे. यामुळे पनवेल ते बोरीवलीचा प्रवास सुसाट होणार आहे.

पनवेलवरून बोरीवली आणि विरारला जाणाऱ्या प्रवाशांसाठी लोकलने गोरेगावपर्यंत जावे लागते त्यानंतर पुन्हा लोकल बदलून त्यांना पुढचा प्रवास करावा लागतो. कधी कधी लोकल नसल्यावर या प्रवाशांना आधी हार्बर मार्गावरून कुर्लापर्यंत प्रवास करावा लागतो त्यानंतर मध्य रेल्वे मार्गावरून त्यांना दादर येथे जाऊन पुढे वेस्टर्न मार्गावरून बोरिवली किंवा विरारपर्यंत प्रवास करावा लागतो. पण आता त्यांना थेट पनवेलवरून बोरिवली- विरारपर्यंत प्रवास करणं शक्य होणार आहे कारण पनवेलवरून त्याठिकाणी जाण्यासाठी थेट लोकल सुटणार आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या 'एमयूटीपी ३ ब' प्रोजेक्ट संचामध्ये नवीन पनवेल-वसई उपनगरी रेल्वे मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. वसईपासून पुढे बोरिवली आणि विरार अशा दोन्ही दिशांना याची जोडणी केली जाणार आहे. 'एमयूटीपी' अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या रेल्वे प्रोजेक्ट राज्य आणि केंद्र सरकारकडून ५०:५० प्रमाणे निधी दिला जातो. नवीन पनवेल-वसई लोकल मार्ग सुरू करण्याबाबत सविस्तर प्रोजेक्ट अहवाल तयार करण्यात आला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सगळीकडे लोकलचे जाळे पसरले आहे. सध्या फक्त पनवेल-दिवा-वसई मार्गावर मुंबई लोकल धावत नाही. याठिकाणी मेमू रेल्वे धावत आहेत. पण मेमो रेल्वेच्या देखील मोजक्याच फेऱ्या होतात. यामुळे पनवेल-वसई लोकल सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून वारंवार होत आहे. जर पनवेल-वसई लोकल सुरू झाली तर या मार्गावरील विकास देखील वेगाने होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT