Shruti Vilas Kadam
आज आपण मुंबई जवळील पनवेलमधील भेट देण्यासारख्या ६ ठिकाणांबद्दल जाणून घेऊ.
ही सुंदर ठिकाण जास्त लांब नसून रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे स्थित आहे.
कर्नाळा किल्ला फनेल किल्ला म्हणूनही ओळखला जातो आणि तो पनवेलपासून १० किमी अंतरावर आहे.
आदई धबधबा हा पनवेलमधील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे. हा धबधबा पनवेल स्टेशनपासून गाडीने १५ मिनिट अंतरावर आहे.
बल्लाळेश्वर मंदिर हे गणपतीचे सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या बाजूलाच सुंदर असा तलाव देखील आहे. हे मंदिर पनवेल स्टेशनपासून चालत २० मिनिट अंतरावर आहे.
कर्नाळा पक्षी अभयारण्य पनवेल जवळ आहे, या ठिकाणी तुम्हाला प्राणी आणि निर्सगाचे सुंदर दृश्ये पाहायला मिळतील.
पनवेलमध्ये राहून तुम्ही प्रबळगड किल्ल्याला भेट देऊ शकता, प्रबळगड किल्ला स्टेशनपासून १ तासावर आहे. इथे तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.
गडेश्वर धरण हा पनवेलजवळील सर्वोत्तम आणि निसर्गाने नटलेले सुंदर असे धारण आहे. हे धरण पनवेल स्टेशनपासून १ तासावर आहे.