good news Ekvira Devi temple will remain open for 24 hours for darshan for next two days Saam TV
मुंबई/पुणे

Ekvira Devi Temple: भाविकांसाठी आनंदाची बातमी, आई एकविरा देवीचे मंदिर राहणार २४ तास खुलं, प्रशासनाचा निर्णय

Maval News Today: महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेले लोणावळ्यातील कार्ला गडावरील आई एकवीरा देवीचं मंदिर पुढील दोन दिवस २४ तास दर्शनासाठी खुलं राहणार आहे.

Satish Daud

दिलीप कांबळे, साम टीव्ही

Ekvira Devi Temple News

महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेले लोणावळ्यातील कार्ला गडावरील आई एकवीरा देवीचं मंदिर पुढील दोन दिवस २४ तास दर्शनासाठी खुलं राहणार आहे. नवरात्रीत भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून देवी संस्थानच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली. (Latest Marathi News)

यंदा नवरात्रोत्सव थाटात साजरा होत असून ठिकठिकाणी दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. त्यातच देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाचे आता शेवटचे दोन दिवस राहिले आहेत. या दोन दिवसात सुट्ट्या देखील असल्याने लोणावळ्यातील कार्ला गडावर येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढत आहे. अनेक भाविक पहाटेच्या दर्शनासाठी रात्रीच गडावर येऊन बसत आहेत.

हीच बाब लक्षात घेता पुढील दोन दिवस एकवीरा आईचं मंदिर भाविकांसाठी २४ तास खुलं ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, भाविकांनी देवीचं दर्शन घेतल्यानंतर जास्त वेळ गडावर थांबून गर्दी करू नये, रांगेत दर्शन घ्यावे, असं आवाहन मंदिर प्रशासन तसेच पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

TET Exam Result: महत्त्वाची बातमी! आज टीईटी परीक्षेचा निकाल| VIDEO

इंग्लडचं मैदान गाजवलं, पण आशिया कपमधून गिलला मिळणार डच्चू? अजित आगरकरांच्या मनात नेमकं काय?

Maharashtra Water Dam : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, राज्यातील प्रमुख धरणं तुडुंब भरली; पाणीटंचाईचा प्रश्न सुटला

Coolie VS War 2: रविवारी 'कुली'चा बोलबाला, 'वॉर २'ला पछाडले; चौथ्या दिवशी केलं इतक्या कोटींचं कलेक्शन

SCROLL FOR NEXT