Green Field Express Way Saam TV
मुंबई/पुणे

Green Field Express : खुशखबर! पुणे-संभाजीनगर प्रवास आता सव्वादोन तासांतच होणार; कसा ते पाहा VIDEO

Green Field Express Way : छत्रपती संभाजीनगर ते पुणे प्रवास सुसाट होणार असून 225 किलोमीटरचे अंतर आता सव्वादोन तासांतच गाठता येणार आहे.

Satish Daud

मयुरेश कडव, साम टीव्ही मुंबई

छत्रपती संभाजीनगर ते पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. संभाजीनगर ते पुणे प्रवास सुसाट होणार असून 225 किलोमीटरचे अंतर आता सव्वादोन तासांतच गाठता येणार आहे. एनएचएआय आणि एमएसआरडीसीने या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या प्रस्तावित ग्रीन फील्ड महामार्गाचं अलाइनमेंट पूर्ण झालं आहे. येत्या काही महिन्यांतच हा महामार्ग समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे.

कसा असेल संभाजीनगर-पुणे महामार्ग?

  • छत्रपती संभाजीनगर ते पुणे नवीन महामार्ग हा 225 किमी लांबीचा असणार आहे.

  • पुण्याच्या केसनंद गावापासून शिरूरपर्यंत 53 किमीचा उड्डाणपूल असेल.

  • या उड्डाणपुलासाठी एकूण 7,515 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.

  • छत्रपती संभाजीनगर ते शिरूरपर्यंत 4 टोलनाके असतील.

  • अहमदनगर आणि तिथून पुढे संभाजीनगरमार्गे समृद्धीला जोडणार आहे.

या महामार्गाचा प्रस्ताव अंतिम झाल्यास बिडकीन नोड थेट समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे नागपूर ते जालना आणि पुढे छत्रपती संभाजीनगर ते पुणे प्रवास सुस्साट आणि कमी वेळेत समृद्धी महामार्गावरून करणं शक्य होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Adulterated Sweets: ऐन सणासुदीत भेसळीचा काळाबाजार; बाजारात विकला जातोय नकली खवा?

Maharashtra News Live Updates: कल्याण पश्चिम विधानसभेतील शिवसेना शिंदे गटाचे बंडखाेर उमेदवार अरविंद मोरे यांची माघार

Fire Cracker Blast: स्कुटीवरून फटाके नेताना अचानक स्फोट झाला; Video बघून काळजाचा थरकाप उडेल

Maharashtra Politics: काँग्रेस पुन्हा फुटणार? कोल्हापुर, मुंबईत काँग्रेसला धक्के; विधानसभेनंतर राजकीय भूकंप होणार?

Assembly Election 2024: राज्यात वयाची शंभरी पार केलेले 47 हजार मतदार, महिला - पुरुषांची संख्या किती? निवडणूक आयोगाने दिली A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT