Ajit Pawar News  Saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar : 'सोनं स्त्रियांनाच शोभून दिसतं'; पुण्यातल्या गोल्डमॅनना अजितदादांच्या कानपिचक्या, VIDEO

Ajit Pawar News : राज्यात गोल्ड मॅन उदंड झाले आहे. किलो किलो सोनं अंगावर घालून गोल्डमॅन फिरु लागले... मात्र सोनं घालून शो बाजी करणाऱ्या गोल्डमॅनवर अजित पवारांनी मिश्किल टिपण्णी केलीय.. अजित पवारांनी नेमकं काय म्हटलंय? पाहूयात या विशेष रिपोर्टमधून..

Girish Nikam

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार भारतीय महिलांकडे अंदाजे 24 हजार टन सोने आहे. जे जगातील एकूण सोन्याच्या साठ्याच्या 11% आहे आणि हे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. सोने केवळ संपत्तीचे प्रतीक नाही तर ते भारतीय संस्कृतीत परंपरा आणि भावनांशी जोडलेले आहे. पण सोन्याचा हा मोह केवळ महिलांनाच नाही तप पुरूष वर्गालाही आहे. अनेक पुरुषही अंगावर किलो-किलोने सोनं घालताय.

सध्या सोन्याचा भाव सव्वा लाखांच्या घरात गेलाय. तरी हे गोल्डमॅन मागे हटायला तयार नाहीत. यावरुन पुण्यातल्या चाकण मध्ये सराफ दालनाच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवारांनी गोल्डमॅनना कानपिचक्या दिल्यात. सोनं हे पुरुषांना नाही तर स्त्रियांना शोभुन दिसतं, अशी टोलेबाजी केली आहे.

गळ्यात, हातात माफक सोनं घालणं कोणाला आवडत नाही. मात्र अगदी किलोकिलोने सोनं घालणारे पुण्यातच अनेक जण आहेत.

खडकवासल्याचे मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे गोल्ड मॅन म्हणून चर्चेत होते. त्याशिवाय पिंपरीत दत्ता फुगे त्यांच्या सोन्याच्या शर्टमुळे प्रसिद्ध होते. पिंपरीतीलच सनी वाघचौरे उर्फ नाना हा तरुण सोन्यामुळे चर्चेत आहे. त्याने कपिल शर्मा शोमध्येही हजेरी लावली आहे. पनवेल मधील दिवंगत गोल्डमॅन पंढरीशेठ फडके बैलगाडा शर्यतींमध्ये हातात आणि गळ्यात सोने घालून गाडीच्या टपावर नाच करण्यासाठी प्रसिद्ध होते.

पनवेलचे आरपीआयचे नेते जगदिश गायकवाडही भरपूर सोनं परीधान करतात. त्याशिवाय नागपूरचे आशीष मंपिया, मुंबईतील डॉ. रोहित पिसाळ, उद्योगपती-राजकारणी पंकज पारख अशी अनेक नावे आहेत. त्यांच्या अंगावरील सोन्यामुळे ते लोकांच्या आकर्षणाचे कारण ठरलेत.

सोनं लाखांच्या पलिकडे गेले असलं तरीही सुरक्षित गुंतवणूक म्हणून सर्वसामान्यांची सोन्यालाच पसंती आहे. काहींना मात्र अंगभर सोनं परीधान करुन मिरवायला आवरतं. मात्र हा सोनेरी शौक कधी-कधी अडचणीचाही ठरतो. आता किती गोल्डमॅन अजित पवारांचा सल्ला ऐकून अंगावरचं सोनं उतरवतात आणि आपल्या प्रिय पत्नीच्या हाती देतात हे सुद्धा पहावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यातील 16 ऊसतोड मजुरांची कर्नाटकच्या बिजापूर जिल्ह्यातून सुखरूप सुटका

UPSC Recruitment : यूपीएससीची मोठी भरती, थेट मंत्रालयात मिळणार पोस्टिंग, वाचा सविस्तर माहिती

Ratnagiri: प्रसिद्ध आंबा व्यापाऱ्याची आत्महत्या, स्वत:वर गोळी झाडून संपवलं आयुष्य; रत्नागिरी हादरली

Crime news: माणुसकीला काळीमा फासणारी घटना, ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

Ashok Kharat Update : अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांच्या बहिणीची चौकशी, VIDEO

SCROLL FOR NEXT