Sanjay Raut  Saam Tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut: पर्रीकरांच्या मतदारसंघातून भाजपकडून माफियाला तिकीट, उत्पल पर्रीकरांचं तिकीट का थांबवलं - संजय राऊत

गोव्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र, सध्या त्यावरुन महाराष्ट्रातील राजकारणात चांगलीच खळबळ माजलेली पाहायला मिळत आहे.

जयश्री मोरे

मुंबई : गोव्यात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही. सर्वच पक्ष एक दोन जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गोव्यात वेगळीच खिचडी शिजत आहे. उत्पल पर्रीकर हे दरदर की ठोकरे खा रहे, आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचं म्हंटल तर आता भाजपमधे आता धावपळ सुरू झाली, असं म्हणत शिवेसनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे (Goa Legislative Assembly election Sanjay Raut Criticize BJP Over Not Giving Ticket To Utpal Parrikar).

गोव्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र, सध्या त्यावरुन महाराष्ट्रातील राजकारणात चांगलीच खळबळ माजलेली पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी गोव्यात भाजपविरोधात लढण्याची तयारी करताना दिसत आहेत. त्यावरुन राज्यातील भाजप आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरु आहे. त्यावर आज माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी भाजपवर टीका केलीये.

उत्पल पर्रीकरांच्या जागी माफियाला तिकीट - संजय राऊत

"पर्रीकर ज्या पणजी मतदार संघातून निवडून येत होते त्या मतदार संघातून माफियाला तिकीट देत आहे. बिनविरोध निवडून देण्यासाठी त्यांचं तिकीट का थांबवलं. अपक्ष उभे राहणार असतील तर सर्व राजकीय पक्षांनी मनोहर पर्रीकरांना ती श्रध्दांजली होईल, याला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. उद्या गोव्यात जात आहे. तिथे निर्णय होईल आणि उमेदवार घोषित करू", असं संजय राऊत म्हणाले..

योगी ढोंग करत आहेत - संजय राऊत

योगी हे दलितांच्या घरी जात आहेत, ते ढोंग आहे. रवी किशन यांच्या व्हिडीओ वरुन ते सिद्ध झालं.

अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीत वरचेवर रॅली घ्यावी असं म्हटलं आहे. उत्तर प्रदेश मधील वातावरण बदलायचं असेल तर त्यांनी व्हर्चुअल रॅली केली आणि त्यातून अखिलेश यादव यांना फायदा होत असेल तर त्यांनी व्हर्चुअल रॅली करायला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : एसआरए इमारतीत BMC कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला, मुंबईत धक्कादायक घटना

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्याच्या वाळू धोरणात मोठे बदल, घरकुल योजनेसाठी १० टक्के वाळू मोफत मिळणार

Maharashtra Live News Update: घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना १० टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा

Jio Special Offer: दिवाळीपूर्वी जिओची खास ऑफर! मोफत डेटा आणि कॉलिंगसह मिळतील अनेक फायदे, किंमत किती?

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी नाशिकमध्ये मोठी घडामोड, भाजप नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT