Sanjay Raut On UP Election: ...तर गंगा नदीतले मृतदेह योगींना मतदान करणार आहेत का?

Sanjay Raut on UP Election: उत्तर प्रदेश, गोवा, मणिपुर, पंजाब आणि उत्तराखंड या पाच राज्यांत निवडणुका जाहिर झाल्या आहेत.
Sanjay Raut Vs Yogi Adityanath
Sanjay Raut Vs Yogi AdityanathSaam Tv
Published On

मुंबई: देशातील पाच राज्यात यंदाच्या वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. यात उत्तर प्रदेश, गोवा, मणिपुर, पंजाब आणि उत्तराखंड या पाच राज्यांत निवडणुका जाहिर झाल्या आहेत. भाजपकडून (BJP) सातत्याने होणाऱ्या टीकेबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर प्रदेशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर निशाणा साधला आहे. (Latest News on Sanjay Raut on UP Elections 2022 )

हे देखील पहा -

उत्तर प्रदेश निवडणुकांच्या (UP Elections 2022) बाबतीत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, योगींनी कुठून लढावं याच्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही, तो त्यांचा विषय आहे. ज्या पद्धतीने यूपीमध्ये अराजकता आहे, ज्याप्रमाणे गंगा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात मृतदेह आढळून आलेत, असं असूनही त्यांना जर वाटत असेल की आम्हाला तीनशे जागा मिळू शकतात तर गंगा नदीमधले मृतदेह त्यांना मतदान करणार आहेत का? असा खोचक सवाल त्यांनी योगी आदित्यानाथ यांना केला आहे.

पुढे ते म्हणाले की, दलितांच्या घरी तुम्ही जाऊन जेवता, तर तुम्ही एका माणसाच्या घरी जाऊन जेवत आहात. हे एक ढोंग आहे, देश पुन्हा एकदा जाती व्यवस्थेवर विभाजित होईल, हे वोट बँक राजकारण आहे असंही राऊत म्हणाले आहेत.

Sanjay Raut Vs Yogi Adityanath
खतांच्या वाढलेल्या किंमती पूर्ववत करा; दादा भुसे यांचे मनसुख मांडविय यांना पत्र

उत्तर प्रदेशात विधानसभेच्या ४०३ जागा आहेत. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत ३०५ जागा जिंकत भाजपने विरोधकांना चीतपट करत एकहाती सत्ता आणली होती. २०१७ मध्ये भाजप ३०५ जागा, अपना दल सोनेलाल ८ जागा, समाजवादी पार्टी ६० जागा, सुहेलदेव भारतीय समाज पार्टी ४ जागा, प्रगतीशील समाज पार्टी (लोहिया) १ जागा, बहुजन समाज पार्टी ४ जागा, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस ३ जागा, जनसत्ता दल (लोकतांत्रिक) २ जागा आणि अपक्ष ५ जागा अशा एकुण ४०३ जागा आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com