"प्रभाकरने केलेल्या गौप्यस्फोटाबद्दल कौतुक; प्रभाकरला पोलीस संरक्षण द्या" Saam Tv News
मुंबई/पुणे

"प्रभाकरने केलेल्या गौप्यस्फोटाबद्दल कौतुक; प्रभाकरला पोलीस संरक्षण द्या"

प्रभाकरने असा गौप्यस्फोट करून देशावर उपकार केले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: क्रूझ पार्टी प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. कालच के पी गोसावी अर्थात किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल ने काल खळबळजनक खुलासा केला होता. समीर वानखडे क्रूझवर रेड टाकत असताना किरण गोसावीला बरोबर घेऊन गेले होते. रेड टाकल्यानंतर आर्यन खानला NCB ने ताब्यात घेतल्यानंतर शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी किरण गोसावी आणि सॅम नावाची व्यक्ती भेटली असल्याचे प्रभाकरने सांगितले होते. निळ्या मर्सिडीज कार मध्ये त्याची बोलणी झाली. त्यानंतर गोसावी वाशीला निघून गेला आणि बॉडीगार्ड प्रभाकरला ताडदेवला इंडियाना हॉटेल कडे जायला सांगितलं होत. तिथे 50 लाख कॅश घेऊन बॉडीगार्ड प्रभाकर वाशीला आला आणि पैसे गोसावीला दिले. प्रभाकरने केलेल्या या खुलास्यावर, शिवसेनेचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी आज परकरांशी बोलताना, प्रभाकरने केलेल्या या मोठ्या गौप्यस्फोट केल्याप्रकरणी कौतुक केले आहे.

हे देखील पहा-

ते आज म्हणाले, सॅम हा money laundering प्रकरणातील मुंबईमधील सर्वात मोठा मासा आहे. 25 कोटींची मागणी सॅम नावाच्या मध्यस्थीमार्फत करण्यात आली होती. प्रभाकरने क्रूझ पार्टी बद्दल गौप्यस्फोट करून खूप मोठं काम केलं आहे. प्रभाकर साईल हा देशभक्त आहे' असे म्हणत राऊतांनी प्रभाकरवर कौतुकाची थाप दिली.

राऊत पुढे म्हणाले, प्रभाकरने असा गौप्यस्फोट करून देशावर उपकार केले आहेत. गृहखात्याने प्रभाकरच्या सुरक्षिततेची जबाबदारी राज्य सरकारने घयायला हवी. SIT कडून आता या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी.

पुढे बोलताना ते म्हणाले, किरण गोसावी हा कुठे आहे भाजपला माहिती असेल. परमबीर सिंग कुठे आहे हेही त्यांना माहिती असेल कारण महाराष्ट्राला बदनाम करण्याची यांनी एकही संधी यांनी सोडली नाही, असा गंभीर आरोप त्यांनी भाजपवर केला आहे.

राऊत म्हणाले, प्रभाकर हा महत्त्वाचा साक्षीदार आहे. त्याची सुरक्षा व्हायला हवी. हे राज्याला बदनाम करण्याचं षड्यंत्र एका पक्षाने रचलं आहे. याला त्याला काही अधिकाऱ्यांनी साथ दिली आहे. प्रभाकरच्या साहसाचं कौतुक आहे. त्याच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी.

दरम्यान आज, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक Nawab Malik यांनी आज दोन टि्वट करत आणखी एक गैाप्यस्फोट केला आहे. मालिकांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याबाबत काही पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला आता नवीन वळण लागले आहे.

मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) याचा एक फोटो टि्वट करीत एक प्रश्न उपस्थित केला आहे. आपल्या टि्वटर अकाऊंटवरून समीर वानखेडेंचा फोटो टि्वट केला आहे, या फोटो एक महिला व अन्य जण दिसत आहे. वानखेडे यांच्यासोबत असलेली महिला ही डॅा. शबाना कुरेशी असल्याचे समजते आहे. तिच्यासोबत समीर वानखेडे याचं पहिलं लग्न झालं असल्याचे माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

SCROLL FOR NEXT