Thackeray Group BMC Morcha Saam TV
मुंबई/पुणे

Thackeray Group BMC Morcha: आदित्य ठाकरेंच्या मोर्चा आधीच मुंबईत वातावरण तापलं, महापालिका परिसरात लागले सुशांत सिंगचे बॅनर्स

Sushant Singh Rajput Banner: सुशांतच्या चाहत्यांकडून महानगरपालिका परिसरात त्याला न्याय मिळवून द्या अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत.

Ruchika Jadhav

BMC Morcha News: मुंबई महानगरपालिकेवर आज शिवसेना ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. मात्र मोर्चा निघण्याआधीच मुंबईतील वातावरण तापलेलं दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आवारात दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे फलक लावण्यात आलेत. (Latest Thackeray Group BMC Morcha News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आज आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा निघणार आहे. त्यामुळे सुशांतच्या चाहत्यांकडून महानगरपालिका परिसरात त्याला न्याय मिळवून द्या अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या आवारात लागलेले फलक पाहून एकच खळबळ उडाली आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांनी सुशांत सिंग राजपुतला न्याय द्या अशी मागणी फलक लावत केली आहे. आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत असे देखील या बॅनरमध्ये म्हटलं आहे.

शिवसेनाचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोर्चा आज (१ जुलै) दुपारी २ वाजता वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो सिनेमा) येथून सुरु होईल. तसेच महानगरपालिका मार्गावरून मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयापर्यंत जाणार आहे.

सदर मोर्चावर पोलिसांनी काही अटी घातल्या आहेत

१. मोर्चा दिलेल्या मार्गावरुनच नेण्यात यावा व कोणत्याही परिस्थितीत मार्ग बदलू नये. मोर्चा निघाल्यानंतर मार्गावर रेंगाळत ठेवू नये.

२. नमुद आयोजित कार्यक्रमापूर्वी आवश्यक असलेल्या इतर शासकीय विभागाचे आवश्यक ते परवाने प्राप्त करावेत. तसेच आपले तर्फे उभारण्यात आलेल्या स्टेजचे संबंधीत ठेकेदाराकडून तसेच सार्वजनिक बांधकाम स्टेज स्टॅबिलीटी प्रमाणपत्र प्राप्त करून, सर्व परवाने आझाद मैदान पोलीस ठाणे येथे कार्यक्रमा पूर्वी सादर करावेत.

३. मोर्चा / सभेदरम्यान कोणत्याही व्यक्तीच्या समुदायाच्या धार्मीक /जातीय/ सामाजीक / राजकीय भावना दुखावल्या जातील अशा आक्षेपार्ह प्रतिमांचे, देखाव्यांचे, बॅनरचे प्रदर्शन करणे, घोषणा देणे, आक्षेपार्ह व अश्लील गाणे अथवा वाद्य वाजविणे किंवा तत्सम प्रकार करता येणार नाहीत. मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला येतांना व परत जातांना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी.

४. मार्चमध्ये बोलावलेल्या सर्व वाहनांना पोलीसांनी दिलेल्या मार्गाने प्रवास करण्याचा व मार्ग न बदलण्याच्या सुचना द्याव्यात वाहनांनी शहरात प्रवासा दरम्यान त्या त्या रस्त्यावर विहीत वेगमर्यादिचे पालन करावे. मार्चमध्ये आलेल्या नागरीकांना त्यांचे वाहने (दोन चाकी, चार चाकी व इतर कोणतेही वाहन) पार्कंगसाठी निर्धारीत केलेल्या ठिकाणीच पार्किंग करण्याच्या सुचना द्याव्यात. मार्चासाठी येताना अथवा परत जातांना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल, कार रॅली काढू नये. त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री यांना अधिकृत सुरक्षा पुरविण्यात आली असून आयोजकांनी त्यांच्या मोर्च्याच्या तसेच सभेच्या ठिकाणी येण्याच्या व सभेवरुन परत जाण्याच्या वेळी कोणतीही रॅली काढू नये.

५. मोर्च्याच्या दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, लाठी, पुतळे इत्यादी बाळगू, नये अगर प्रदर्शन करू नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करु नये.

६. सभेचे ठिकाणी पुरेशे अग्निशमन दल हजर राहील याची दक्षता घ्यावी. सभेचे ठिकाणी महानगर पालिका यांचेशी संपर्क साधून अग्निशमन यंत्रणा व आवश्यक Portable Fire Extinguisher यंत्र राहतील याची दक्षता घ्यावी. ८. मोर्चा / सभेचे ठिकाणी रुग्णवाहीकेची व्यवस्था करावी. तसेच तात्पुरते वैद्यकीय सेवा, वैद्यकीय अधिकारी व आपात्कालीन व्यवस्थेचे आयोजन करावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP vs Congress:'सत्तेच्या भुकेपोटी भारताची बदनामी करू नका'; भाजप प्रदेशाध्यक्षांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

राज्यातील जिल्ह्यांची संख्या वाढणार, कोणता बनणार नवा जिल्हा? सुनिल तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण

Konkan Alphonso Mango GI Tag Row: कोकणचा हापूस चोरण्याचा गुजरातचा डाव; 'हापूस'च्या जीआय मानांकनावरून वाद पेटला

'12 लाखांपर्यंतचा टॅक्स माफ केला, तुम्ही पगार वाढवला का?' पंतप्रधानांकडून उद्योगपतींची कानउघडणी

Saturday Horoscope: शनिवारी ग्रहांची मोठी कृपा! या राशींना मिळणार मेहनतीचे फळ, तर काहींना घ्यावी लागणार काळजी

SCROLL FOR NEXT