crime saam tv
मुंबई/पुणे

बॉयफ्रेंडला यायची Ex Girlfriendची वारंवार आठवण, प्रेयसीने व्हायरल केले तरुणीचे न्यूड फोटो

इंस्टाग्रामवर कोणीतरी आपले नग्न छायाचित्रे अपलोड केल्याचे समजल्यानंतर तक्रारदार महिलेने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पोलिसात तक्रार दाखल केली होती.पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध एफआयआर नोंदवला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - मुंबई शहर सायबर पोलिसांनी (Mumbai Cyber Police) माहीम येथील एका १६ वर्षीय तरुणीला तिच्या प्रियकराच्या एक्स गर्लफ्रेंडचे नग्न छायाचित्रे सोशल मीडियावर अपलोड केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. या घटनेची पोलिसांना तक्रार करणारी अल्पवयीन मुलगी, तिचा प्रियकर आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड हे सर्व माहीमचे रहिवासी आहेत.

या घटनेबाबाद एका पोलीस (Police) अधिकाऱ्याने सांगितले की, "ती एका तरुणासोबत रिलेशनशिपमध्ये असताना हे खाजगी फोटो काढण्यात आले होते. त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले आणि त्याचे एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले.

हे देखील पहा -

इंस्टाग्रामवर कोणीतरी आपले नग्न छायाचित्रे अपलोड केल्याचे समजल्यानंतर तक्रारदार महिलेने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पोलिसात तक्रार दाखल केली होती.पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध एफआयआर नोंदवला होता.

पोलिसांनी प्रथम तक्रारदाराची वैयक्तिक छायाचित्रे अॅपवरून काढून टाकली. सुरुवातीला या कृत्यामागे तक्रारदाराच्या माजी प्रियकराचा हात असल्याचा संशय पोलिसांना होता, मात्र नंतर ही नग्न छायाचित्र अपलोड करणाऱ्याचा फोन नंबर पोलिसांच्या हाती लागला तेव्हा ती व्यक्ती दुसरी कोणी नसून अल्पवयीन मुलगी असल्याचे आढळून आले. दरम्यान या प्रकरणी अल्पवयीन मुलीला डोंगरी येथील बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ulhasnagar Tourism: उल्हासनगरपासून अवघ्या ८४ किमी अंतरार वसलंय 'हे' शांत आणि थंडगार ठिकाण; आजच प्लान करा

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; भरधाव कंटेनरनं २० गाड्यांना उडवलं, ४ जणांचा मृत्यू, VIDEO समोर

Shocking : लग्न करण्यास नकार दिल्याने हत्या, प्रसिद्ध कंटेंट क्रिएटरला विष देऊन संपवलं

Periods and Shravan : मासिक पाळीत श्रावणाचा उपवास करावा की नाही?, जाणून घ्या वैज्ञानिक कारणे

Maharashtra Live News Update: "भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय"; अनिल गोटेंचा सरकारवर घणाघात

SCROLL FOR NEXT