Girl molested saam tv
मुंबई/पुणे

पुण्यात संतापजनक घटना ! मूकबधीर मुलीचे अपहरण करुन लैंगिक अत्याचार

'त्या' घटनेमुळं पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : पुण्यात महिलांवरील अत्याचार होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका मुकबधीर मुलीवर लैंगिक अत्याचार (Girl Molested) झाल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन नराधमांनी मूकबधीर मुलीचं अपहरण करुन (Kidnapping) दारु पाजल्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. 20 मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या गंभीर घटनेमुळं पुण्यात (Pune) महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या गंभीर घटनेची वानवडी पोलिसांनी (wanawadi police) तातडीनं दखल घेतली असून दोन आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर राठोड नावाच्या व्यक्तीसह दोघांविरुद्ध अपहरण तसेच लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. वानवडी परिसरामध्ये 20 मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुकबधीर मुलगी तिच्या घरासमोर खेळत होती.त्यावेळी राठोड नावाचा व्यक्ती व त्याच्या साथीदाराने तिचे अपहरण केले.मुलीला धमकावून निर्जनस्थळी नेले. तेथे त्यांनी मुलीला जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर त्यांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केले.दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्यामुळे तिच्या आइने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली.शेजाऱ्यांकडे चौकशी केल्यानंतर दोघेजण तिला दुचाकीवरुन घेऊन गेल्याची माहिती त्यांना मिळाली.

त्यानंतर मुलीच्या आईने तात्काळ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानंतर संशयित आरोपीं मध्यरात्री मुलीला तिच्या घराजवळ सोडून पसार झाले. त्यानंतर मुलीच्या आईने तिला तात्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीमध्ये मुलीला दारु पाजुन तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. दरम्यान, मुलीने खाणाखुणांनी तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांकडून पसार झालेल्या आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup : वर्ल्डकपमधून विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार संघ आऊट, श्रीलंका बाहेर; न्यूझीलंडचा दणदणीत विजय

MSRTC: शिवशाही बस आता नव्या अवतारात येणार; राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूदरात लक्षणीय घट; सरकारचे कोणते उपाय ठरताहेत गेम चेंजर?

खाण उपसंचालकावर व्हिजिलन्सची धाड, अधिकाऱ्याच्या घरात नोटांच्या थप्या

कर्जफेडीसाठी 19 शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या, विरोधक आक्रमक, अधिवेशनात पडसाद

SCROLL FOR NEXT