''खाकीतला घोडेवाला'' ड्युटी निभावण्यासाठी पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल चेतन इंगळे
मुंबई/पुणे

''खाकीतला घोडेवाला'' ड्युटी निभावण्यासाठी पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

सागरी भागातीत समुद्रकिनाऱ्यावर दुचाकी किंवा चारचाकीने गस्त घालता येत नसल्याने अर्नाळा सागरी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी चक्क घोड्यावर बसुन गस्त घालण्यास सुरवात केली आहे.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई विरार - महाराष्ट्र पोलिस दलातील अनेक पोलिस आपली ड्युटी प्रामाणिकपणे करतात. ड्युटी करत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र तरीही ते आपलं कर्तव्य चोख बजावतात. आपली ड्युटी चोखपणे करता यावी यासाठी पोलिस उपनिरिक्षक अमर पाटील यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. सागरी भागातीत समुद्रकिनाऱ्यावर दुचाकी किंवा चारचाकीने गस्त घालता येत नसल्याने अर्नाळा सागरी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी चक्क घोड्यावर बसुन गस्त घालण्यास सुरवात केली आहे. ("GhodeWala police" A unique idea by the police to fulfill their duty)

हे देखील पहा -

सागरी किनारपट्टीवर वाळूची जमीन, दलदलीची जागा आणि कच्चे रस्ते यामुळे पोलिसांना गस्त घालणे शक्य होत नव्हतं. अशा किनारपट्टीवर गस्त घालण्यासाठी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी चक्क घोड्यावरून गस्त घालायला सुरवात केली आहे. घोड्यावरचा पोलीस हा सध्या विरार अर्नाळा परिसरात आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे.

घोडेस्वाराकडून महिन्याभराचे प्रशिक्षण घेऊन पोलिसांनी घोड्यावरुन गस्त सुरू केली. त्यामुळे या भागात अमर पाटील यांची “घोडेवाला पोलीस” अशी ओळख बनली आहे. ते पोलीस गणवेशात गस्त घालायला निघाले की लोकंही त्यांच्याकडे कुतूहलाने बघतात, त्यांचे फोटो घेत असतात. त्याचप्रमाणे गस्तीसाठी वापरण्यात येणारे हे घोडे याच भागातील घोडेस्वारांचे असल्याने घोडे सांभाळण्याचा खर्चही पोलिसांना येत नाही. शिवाय या भागातील घोडेस्वारांना पैसेही मिळतात.

सागरी किनाऱ्यावर अनेक पर्यटक येत असतात. अशात काही विकृतांमुळे अघटीत घटना घडण्याची शक्यता असते. शिवाय अनेकजण सागरी किनाऱ्यावर मद्यपान करण्यास येतात, काहीजण आत्महत्या करण्यास येतात, काहीजण पाण्यात पोहायला गेल्यावर दुर्घटना होऊ शकते. तसेच अवैध वाळू उपसा आणि वृक्षतोही समुद्रकिनारी होत असते त्यामुळे हे सर्व गैरप्रकाकार रोखण्यासाठी सागरी भागांमध्ये गस्त घालणे फार गरजेचे आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सांगलीत कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर?

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

IND vs AUS 1st Test: लाईव्ह सामन्यात हर्षित राणा अन् मिचेल स्टार्क भिडले! नेमकं काय घडलं? -VIDEO

Vidhan Sabha Election Results : सुरुवातीच्या कलात भाजपने गाठलं शतक!

SCROLL FOR NEXT