landlord tenant rules Saam tv logo
मुंबई/पुणे

पुणेकरांनो सावधान! भाडेकरू ठेवलाय पण 'हे' एक काम केलं नाही? घरमालकाला थेट कोर्टाची शिक्षा

landlord tenant rules : पुण्यात भाडेकरूची माहिती पोलिसांना न दिल्याने घरमालकाला न्यायालयाने ₹२,५०० दंड ठोठावला. दंड न भरल्यास ५ दिवसांचा साधा कारावास होणार आहे. जाणून घ्या भाडेकरू ठेवताना घरमालकांनी कोणती काळजी घ्यावी.

Akshay Badve

Pune police tenant verification : घर भाड्याने देताना जर तुम्ही पोलिसांकडे भाडेकरूची माहिती नोंदवली नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भाडेकरूची माहिती पोलिसांना न देणं पुण्यात एका घरमालकाला भलतंच महागात पडलं आहे. या प्रकरणात न्यायालयाने थेट घरमालकाला दोषी ठरवत दंडात्मक शिक्षेची सुनावणी केली आहे. पुणे शहर पोलिसांकडून सध्या भाडेकरूंची माहिती संकलित करण्याची धडक मोहीम सुरू आहे, ही कारवाई शहरातील इतर निष्काळजी घरमालकांसाठी एक मोठा इशारा मानली जात आहे.

भाडेकरूची माहिती पोलिसांना न दिल्यामुळे न्यायालयाने घरमालकाला शिक्षा सुनावली आहे. घर मालकाला न्यायालयाने सुनावला २५०० रुपयांचा दंड, दंड न भरल्यास ५ दिवसांच्या कारावास होणार आहे. पुणे शहर पोलिसांकडून पुणे आणि उपनगरात घर मालकांकडून भाडेकरूंची माहिती जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. भाडेकरूची माहिती पोलिसांना न दिल्यामुळे खडकी पोलिस ठाण्यात घर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सौरभ दुबे असे या घर मालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ दुबे यांचे खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रहिवासी इमारतीमध्ये एक फ्लॅट आहे. दुबे मूळचे नागपूरचे असून ते सध्या दुबईमध्ये वास्तव्यास आहेत. खडकी भागात असणारा एक फ्लॅट यांनी एका भाडेकरूला भाड्याने दिला होता मात्र संबंधित फ्लॅटची भाडेकरार प्रक्रिया त्यांनी केली नव्हती. तसंच भाडेकरूची माहिती पोलिसांना देणं अनिवार्य असताना सुद्धा दुबे यांनी याबाबत काहीही एक स्थानिक पोलिसांना कळवले नव्हते.

दरम्यान शहरात पोलिसांकडून भाडेकरूंची माहिती संकलन करण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. असं असतानाच याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून संबंधित दोषारोपपत्र देखील न्यायालयात सादर केलं होतं. यावर सुनावणी दरम्यान प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी खडकी, पुणे यांनी निकाल दिला आहे. भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये न्यायालयाने आरोपीला २५०० रुपये दंड व दंड न भरल्यास ५ दिवसाचा साधा कारावास ही शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, १ महिन्यापूर्वी पुण्यात भाडेकरूंची माहिती न दिल्याने १७० हून अधिक घरमालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

घर भाड्याने देताना घर मालकांनी घ्याची काळजी

- भाडेकरूचे ओळखपत्र तपासा आणि त्याच्याशी करार करा

- कायमचा पत्ता आणि संपर्क क्रमांक घ्या

- कागदपत्रांची आवश्यक पडताळणी करा

- भाडेकरूची माहिती स्थानिक पोलिस ठाण्यात जाऊन नोंदवा

- करारातील माहिती अचूक आहे, याची खात्री करा

- संशयास्पद माहिती आढळल्यास पोलिसांना कळवा

- भाडेकरार न करणे, तसेच संबंधित माहिती पोलिसांना न दिल्या प्रकरणी घरमालकांविरुद्ध भारतीय नागरिक संहिता सुरक्षा कलम १६३ चे उल्लंघन करणे, तसेच भारतीय न्याय संहिता कलम २२३ नुसार कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI पेमेंट शुल्कावरून सर्वोच्च न्यायालय ॲक्शन मोडमध्ये; केंद्र सरकारसह RBI आणि NPCI ला नोटीस

Kidney Stones : तुम्हाला किडनी स्टोन झालाय? रोज खा 'ही' ४ हिरवी पाने

Maharashtra News Live Update: दुष्काळाच्या मागणीसाठी शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले; सोयाबीन जाळून निषेध

Gold Rate Today: पितृपक्ष सुरू होताच सोनं-चांदी अचानक स्वस्त! सुवर्णनगरीत मोठी घसरण; वाचा आजचे नवे दर

यायचं असेल तर आमच्यासोबत या! राष्ट्रवादी विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT