Gautami Patil gets clean chit in Pune accident case — lawyer claims threat to her life. saam tv
मुंबई/पुणे

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या जीवाला धोका; डान्स शो बंद करण्याच्या धमक्या

Gautami Patil Life Threat: अपघाताप्रकरणी राजकीय वळण लागल्यामुळे गौतमी पाटीलनं माध्यमांसमोर येणं टाळलं. गौतमीच्या जीवाला धोका असल्याचा दावा तिच्या वकिलांनी केलाय.

Bharat Jadhav

  • गौतमी पाटीलने धुडकावली पुणे पोलिसांची नोटीस

  • गौतमी पाटीलच्या वकिलांचा अजब दावा

  • पोलिसांचा आदेश झुगारुन गौतमी पाटील चे "शो" दणक्यात सुरू

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

पुण्यातील अपघात प्रकरणातून गौतमी पाटीलला क्लीनचीट देण्यात आलीय. गौतमी पाटील हिच्या कारचा आणि रिक्षाचा अपघात झाला होता. अपघाताच्या वेळेस गौतमीसुद्धा कारमध्ये होती, असा आरोप करण्यात आला. मात्र अपघातावेळी गौतमी ही कारमध्ये नव्हती, असा खुलासा पुणे पोलिसांनी केला. त्यामुळे पोलिसांकडून गौतमी पाटीलला क्लीनचीट देण्यात आली. मात्र आता गौतमीच्या वकिलांनी मोठा अजब दावा केला.

गौतमी पाटील हिच्या जीवाला धोका होता, अशा दावा तिच्या वकिलांनी केल्याने मोठी खळबळ उडालीय. गौतमी पाटीलला अपघातग्रस्त रिक्षा चालकाला भेटायला जाणार होती, मात्र तिच्या जीवाला धोका होता म्हणून तिने तेथे जाणं टाळलं. गौतमी रिक्षा चालकाला भेटण्यासाठी जाण्याच्या तयारीत होती, मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, या भीतीने गौतमीने जाणं टाळलं, असा दावा तिच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. तसेच शो रद्द करण्याची धमकी आणि अपघाताप्रकरणी राजकीय वळण लागल्यामुळे गौतमी पाटीलने माध्यमांसमोर येणं टाळल्याचं तिच्या वकिलांनी सांगितलंय.

अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलला आपली बाजू मांडण्यासाठी एक नोटीस पाठवली होती. मात्र गौतमीने ८ दिवसानंतर सुद्धा पोलिसांकडे जबाब नोंदवला नाहीये. पोलिसांनी १ तारखेला गौतमीला हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती. आज आठ दिवस होऊनही गौतमी पाटील पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली नाहीये. पोलिसांचा आदेश झुगारुन गौतमी पाटीलचे "शो" दणक्यात सुरू आहेत.

गौतमी पाटीलला क्लीनचीट

या प्रकरणात पोलिसांनी तब्बल १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर अपघातावेळी फक्त गौतमी पाटीलचा चालक वाहनात उपस्थित होता हे स्पष्ट झाले. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताला गौतमीच्या कारचा चालक जबाबदार आहे. अपघाताच्या वेळी ती वाहनात नव्हती. पोलिसांनी अपघात स्थळापासून भोरपर्यंतचे शेकडो सीसीटीव्ही तपासले. त्यात गौतमी पाटील कुठेच दिसले नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या घरी जाणार, तब्येतीची विचारपूस करणार

सरकारचा मोठा निर्णय; शाळा–रुग्णालय परिसरात कुत्रे सोडणाऱ्यांना दंड

'Bigg Boss Marathi'च्या 6 व्या सीझनची घोषणा! रितेश देशमुख की महेश मांजरेकर कोण करणार होस्टिंग? 'या' नावाची तुफान चर्चा

Accident: 'ती' भेट अखेरची ठरली! मित्रांसोबत पार्टी, घराकडे जाताना काळाचा घाला; अपघातात IIM च्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Sambhaji Nagar: धक्कादायक! बनावट कागदपत्रे, सहा महिन्यापासून हॉटेलमध्ये महिलेचे वास्तव्य, पाकिस्तान कनेक्शन झाले उघड

SCROLL FOR NEXT