Andheri Gas Cylinder Blast Saam Tv
मुंबई/पुणे

Andheri Gas Cylinder Blast: अंधेरीत गॅस सिलिंडरचा स्फोट, आगीच्या भडक्यात दोन महिलासह १३ वर्षीय मुलगी भाजली

Andheri Explosion News: मुंबईतील अंधेरी पूर्वेकडील चकाला परिसरात गॅस सिलिंडरच्या व्हॉल्व्हमधून अचानक लागलेल्या आगीत दोन महिला भाजल्या. या महिलांना रूग्णालयात दाखल केले असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

Manasvi Choudhary

Andheri Fire News: मुंबईतील अंधेरी पूर्वेकडील चकाला परिसरात गॅस सिलिंडरच्या मुख्य व्हॉल्व्हमधून अचानक आगीचा भडका उडाल्याने दोन महिला भाजल्याची घटना गुरुवारी (१२ नोव्हेंबर) रात्री घडली. यामध्ये ३५ वर्षीय महिला २५ टक्के, तर १३ वर्षीय मुलगी १४ टक्के भाजली आहे. दोघींनाही उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्वेतील चाकाळा येथील काजूवाडी परिसरात खांदेश्वर मंदिराजवळ असलेल्या बॉम्बरी चाळीतील एका घरात गुरुवारी रात्री ७.३५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ग्राउंड प्लस वन मजली इमारतीच्या तळमजल्यावरील रूम क्रमांक २ मधील स्वयंपाकघरात एलपीजी गॅस सिलिंडरच्या मुख्य व्हॉल्व्हमधून अचानक फ्लॅश फायर झाला. या आगीमुळे घरातील कपडे, दिवा आणि इतर साहित्याने पेट घेतला. सुमारे ३ बाय ३ चौरस फुटांच्या परिसरात आग मर्यादित होती.

या घटनेत रुतिका गौड (वय ३५) या २५ टक्के, तर नेहा गौड (वय १३) ही १४ टक्के भाजली. दोघींना पोलिसांच्या वाहनातून तातडीने कूपर रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, १०८ रुग्णवाहिका आणि महापालिकेचे वॉर्ड कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग विझविण्याचे काम हाती घेत रात्री ८.०४ वाजता आग पूर्णपणे नियंत्रणात आणली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी

Accident: भयंकर अपघात! ७०० मीटर खोल दरीत कोसळली व्हॅन; १४ जणांचा जागीच मृत्यू

Son Papdi Recipes : दिवाळीत भरपूर सोनपापडी मिळालीये? फेकून देण्याऐवजी बनवा 'या' ५ भन्नाट रेसिपी!

Accident : पहाटे भयंकर घडलं! कोस्टल रोडवर ६ वाहनांचा विचित्र अपघात; बोगद्यात गाड्या धडकल्या

Heart Attack Signs : हार्ट अटॅक येण्यापूर्वी त्वचेवर दिसतात 'हे' ७ बदल, दुर्लक्ष करणे पडेल महागात

SCROLL FOR NEXT