KDMC आयुक्तांनी 'या' सत्तावीस गावांची सुपारी घेतली आहे का?  प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

KDMC आयुक्तांनी 'या' सत्तावीस गावांची सुपारी घेतली आहे का?

27 गावात जागोजागी आणि रस्त्याच्या कचरा पडलेला दिसतो. यावरूनच कल्याण-डोंबिवली चे माजी उपमहापौर आणि नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी आयुक्तांवर टीका करत सवाल उपस्थित केला आहे.

प्रदीप भणगे

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत एक वर्षापासून प्रशासकीय राजवट लागू आहे. मात्र, 27 गावातील रस्ते आणि कचरा हा विषय कायम आहे. 27 गावात जागोजागी आणि रस्त्याच्या कचरा पडलेला दिसतो. यावरूनच भाजपचे माजी उपमहापौर आणि नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी आयुक्तांवर टीका करत सवाल उपस्थित केला आहे. भोईर यांनी सांगितले की आयुक्तांनी या सत्तावीस गावांची सुपारी घेतली आहे का? नेहमीच सापत्न वागणूक या 27 गावांना दिली जात असल्याचा आरोप भोईर यांनी केला आहे.

हे देखील पहा :

केडीएमसी क्षेत्रात शून्य कचरा मोहिम राबविली जात आहे. मात्र, शहरात ठिकठिकाणी कचरा साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कल्याण मलंगगड रोड आणि परिसरात कचऱ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. यावरूनच भाजपचे माजी उपमहापौर आणि नगरसेवक यांनी मोरेश्वर भोईर यांची आयुक्तांवर टीका केली आहे. भोईर यांनी सांगितले की त्या रस्त्याच्या कडेला तुम्ही कचऱ्याचे ढीग पाहत असाल आणि याबाबत महापालिका कुठेतरी शंभर टक्के कमी पडत आहे.

यासाठी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करत असतो. आणि प्रत्येक वेळेला नवीन उपायुक्त येऊन काहीतरी नवीन प्रयोग करत असतात आणि त्या प्रयोगाचा परिणाम नागरिकांना भोगावा लागतो. काही बरेच वेळा घंटागाड्या नादुरुस्त असतात, त्याकडे दुर्लक्ष आहे. मध्येच ओला-सुका कचऱ्याचा विषय येतो.आम्हालाही वाटते की नागरिकांनी ओला सुका कचरा वेगळा केला पाहिजे. परंतु, महापालिकेकडे देखील तेवढी क्षमता हवी की तो कचरा घेण्याची, उचलण्याची परंतु तसं नाही. परिणामी नागरिकांना नाईला जास्तव सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकावा लागतो आणि त्यामुळे दुर्गंधी पसरते, रोगराईला सामोरे जावे लागते. अद्याप आमचा 2019 चा नगरसेवक निधी दिलेला नाही असे भोईर यांनी सांगितले. त्यामुळे आतातरी 27 गावात  केडीएमसी प्रशासन आणि आयुक्त लक्ष देणार का हे पाहावे लागेल.

महापालिकेची शून्य कचरा मोहिम...

जे नागरीक ओला-सुका कचरा वर्गीकरण करुन देत नाहीत, त्यांचा कचरा महापालिका स्विकारत नाही. त्यामुळे त्यांचा कचरा रस्त्यावर टाकला जातो. टाकण्यात आलेला कचरा महापालिकेचे सफाई कर्मचारी उचलून कचरा गाडीत टाकत नाही. महापालिकेच्या शहरी भागात शून्य कचरा मोहिम चांगल्याप्रकारे राबविली जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र तशी परिस्थिती 27 गावात नाही.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT