Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Dhanshri Shintre

ड्रायव्हिंग लायसन्स

भारतामध्ये वाहन चालवण्यासाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे अत्यावश्यक आहे, अन्यथा दंडासोबतच कायदेशीर कारवाईलाही तोंड द्यावे लागू शकते.

ड्रायव्हिंग लायसन्स

भारतामध्ये वाहन चालवण्यासाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे अत्यावश्यक आहे, अन्यथा दंडासोबतच कायदेशीर कारवाईलाही तोंड द्यावे लागू शकते.

ऑनलाईन

रस्ते वाहतूक मंत्रालयाने सुरू केलेल्या ऑनलाईन सुविधेमुळे नागरिक घरबसल्या सहज लर्निंग लायसन्स मिळवू शकतात, कुठेही जाण्याची गरज उरलेली नाही.

पायरी १

सारथी पोर्टलवर जाऊन राज्य निवडा, ‘लर्नर्स लायसन्ससाठी अर्ज करा’ वर क्लिक करा आणि 'घरून चाचणी' पर्याय निवडून पुढे जा.

पायरी २

आधार व मोबाईल नंबर टाका, OTPद्वारे पडताळणी करा, माहिती तपासा, अटी मान्य करा आणि UPI, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगने शुल्क भरा.

पायरी ३

लर्निंग लायसन्ससाठी 10 मिनिटांचा व्हिडिओ पाहावा लागतो, ज्यात ट्रॅफिक नियमांची माहिती मिळते, त्यानंतरच चाचणीसाठी OTP व पासवर्ड मिळतो.

चाचणी

चाचणीसाठी मोबाईल किंवा लॅपटॉपचा फ्रंट कॅमेरा ऑन असणे गरजेचे आहे. १० प्रश्नांपैकी किमान ६ बरोबर दिल्यास तुम्ही पात्र ठरता.

लायसन्स लिंक

पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यास चिंता करू नका. ₹५० भरून पुन्हा चाचणी देता येते. पास झाल्यावर लायसन्स लिंक मोबाईलवर मिळेल.

NEXT: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

येथे क्लिक करा