Nilesh Ghaywal  Saam tv
मुंबई/पुणे

Pune News : पुण्यातील कुख्यात गुंडाची बड्या राजकीय नेत्यांसोबत उठबस? अनेक व्हिडिओ समोर; राजकीय वर्तुळात खळबळ

Pune Crime news : पुण्यातील कुख्यात गुंडाचा बड्या राजकीय नेत्यांसोबत वावर असल्याचे समोर आलं आहे. त्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत .

Akshay Badve

पुणे : 'सावंत' साहेबांचं नाव कशाला घेतो असं म्हणत धाराशिवच्या एका व्यावसायिकाला पुण्यातील गुंड निलेश घायवळने धमकावल्याचा एक कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता घायवळचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यापासून शिवसेनेचे आमदार संतोष बांगर, प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर, सुरेश धस यांच्यासोबत निलेश घायवळचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत.

विशेष म्हणजे हे सगळे व्हिडिओ पुणे शहराच्या बाहेरचे असल्यामुळे घायवळ आणि या नेत्यांचे कसे संबंध आहेत हा प्रश्न उपस्थित केला जातोय. तसेच पुण्यातील नामचीन गुंडाला शेजारी बसवत ते अगदी त्याच्या सोबत चालण्यापर्यंत या 'बड्या' नेत्यांना माहिती कशी मिळत नाही, असा सुद्धा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी घायवळच्या थेट मंत्रालयातील रिलची सुद्धा जोरदार चर्चा झाली होती.

गुंड निलेश घायवळची व्यावसायिकाला धमकी

कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा नवा कारनामा समोर आला आहे. आमदार तानाजी सावंत यांच्या बद्दल दिनेश नावाची व्यक्ती काहीतरी बोलली. त्यावरून निलेश घायवळ याने दिनेशला शिवीगाळ केली. तू घरी ये, असं म्हणत दिनेश यांना घायवळने धमकावलं. आता या परिस्थितीमध्ये तानाजी सावंतला मध्ये का घेतोस. मी घरी येतो, नाहीतर तू घरी ये. शिवीगाळ करत तू इकडे धंदा करायचा नाही. पुण्यात जाऊन धंदे कर, नाहीतर धंदे बंद करतो, अशी धमकीने घायवळने दिली.

पासपोर्ट प्रकरणाची चौकशी होणार

निलेश घायवळचे कुटुंबातील सदस्यांच्या पासपोर्ट बद्दल सुद्धा पोलीस चौकशी करण्यात येणार आहे. पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणी पुणे पोलिस आता घायवळच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी करणार असल्याचं समोर आलं आहे. घायवळची पत्नी आणि मुलगा यांनी पासपोर्ट मिळवण्यासाठी काही फेरफार केला का, या दृष्टीने पुणे पोलिसांनी पाऊल टाकलं आहे.

प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडून घायवळच्या पासपोर्टबद्दल पोलिसांना माहिती प्राप्त झाली आहे. २०१९ मध्ये बँक खाते उघडण्यासाठी दिलेल्या रहिवासी पुरावे दिल्यानंतर याच खात्याचा आधार घेत पासपोर्ट मिळवला. खोटा पासपोर्ट केल्याप्रकरणी आज गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Cricket News : माजी क्रिकेटपटू शोएब मलिकचा तिसरा घटस्फोट होणार? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

‘नायक नहीं खलनायक है तू'; काँग्रेसचे नेते संजू बाबावर लय संतापले, काय आहे कारण?

Ganesh Naik Vs Eknath Shinde: ठाण्यात शिंदेसेना विरुद्ध भाजप, नाईक विरुद्ध शिंदे वाद लायकीवर?

Balasaheb Thackeray Death Controversy: बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस का ठेवला? रामदास कदमांच्या विधानामुळे राजकीय खळबळ

Laxman Hake: मराठा नेते मनोज जरांगेंच्या मागण्यांवर लक्ष्मण हाके काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT