Deepak Kesarkar 
मुंबई/पुणे

Ganeshotsav: गणेश भक्तांसाठी शुभ वार्ता! मंडळाच्या कार्यालयाचं भाडं होणार कमी

Deepak Kesarkar: गणेशोत्सव काळात स्पीकर लावण्यासाठी चार दिवस लावता येणार आहे. तसेच कार्यालयासाठी आकारण्यात येणारं भाडे कमी करण्यात आल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिलीय.

Bharat Jadhav

राज्य सरकारने गणेशोत्सव मंडळांना शुभ वार्ता दिलीय. वर्षभर कार्यक्रम राबवणाऱ्या मोठ्या गणेशोत्सव मंडळांना त्यांच्या कार्यालयाचं भाडं कमर्शियल दराप्रमाणे प्रमाणे भाडं घेतलं जातं. ते रेसिडेन्शियल दराने घ्यावं, अशी मागणी केली होती. सरकारने ही मागणी पूर्ण केलीय. कमर्शियल दराने घेतल्यामुळे मोठी थकबाकी होती.त्याच्यावरील व्याज रद्द करावं आणि भाड्याच्या रकमेत 50 टक्के कपात करण्यात यावी, अशी मागणी केली होती. अग्निशामन दलाचे लाखो रुपये भाडे मंडळाला भरावं लागत होतं. ते पूर्णपणे भाडे माफ करण्यात आल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिलीय.

पुढे बोलतांना केसरकर म्हणाले, मूर्तिकाऱ्यांच्या प्रश्नावर सुद्धा चर्चा झाली. मूर्तिकारांना साहित्य सबसिडी योजना राबवण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. लालबागचा राजा किंवा इतर मोठ्या मंडळाच्या आजूबाजूचे पार्किंग लॉट गणेशोत्सव काळात मोफत करण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सव कसा साजरा केला, जाईल यासाठी विशेष इनिशेटिव्ह घेतला जाणार आहे. गणेशोत्सव मुंबईच्या लोकल ट्रेन रात्रभर चालू ठेवण्याची सूचना रेल्वे मंत्रालयाला करणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मत मोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

SCROLL FOR NEXT