Ganeshotsav 2026 will be celebrated for 12 days this year. Saam TV Marathi
मुंबई/पुणे

Ganeshotsav : यंदाचा गणेशोत्सव १० किंवा ११ नाही तर थेट १२ दिवसांचा! 'हे' कारण समोर; पंचांगकर्त्यांचा मोठा खुलासा

Ganesh Chaturthi Latest News : यंदाचा गणेशोत्सव १० किंवा ११ दिवसांचा नसून १२ दिवसांचा असणार आहे. १४ सप्टेंबरला गणपती आगमनापासून २५ सप्टेंबरच्या अनंत चतुर्दशीपर्यंत उत्सव का चालणार, तिथीचे गणित काय आहे आणि हा खरोखर दुर्मिळ योग आहे का, जाणून घ्या.

Akshay Badve

Ganeshotsav 2026 dates Update : यंदाचा गणेशोत्सव नेहमीप्रमाणे १० किंवा ११ दिवसांचा नसून थेट १२ दिवसांचा असणार (why Ganesh festival is 12 days in 2026) आहे. १४ सप्टेंबरपासून बाप्पाचे आगमन होत असून, यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्याने तसेच तिथीच्या वाढीमुळे हा बदल घडला आहे. सोशल मीडियावर या १२ दिवसांच्या उत्सवाबद्दल अनेक तर्क-वितर्क आणि दुर्मिळ योगाच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, हा कोणताही अद्भूत किंवा दुर्मिळ योग नसून केवळ तिथीच्या गणितामुळे झालेला बदल आहे, असा स्पष्ट खुलासा पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी केला आहे. यंदाच्या या १२ दिवसांच्या गणेशोत्सवामागचे नेमके गणित काय आहे, ते सोप्या शब्दात जाणून घेऊया..

येत्या १४ सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात होणारे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाची जोरदार तयारी सुरू आहे. यंदाचा गणेशोत्सव १०, ११ नाही तर १२ दिवसांचा असणार आहे. या १२ दिवसांच्या उत्सवाबद्दल अनेक उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आहेत त्यामुळे गणेश उत्सवाला त्याच दिवशी सुरुवात होते आहे. (Ganeshotsav 2026 tithi calculation explained,)

हिंदू धर्माचे सगळे सण हे तिथी प्रमाणे साजरे केले जातात. कधी तिथीचा क्षय होतो तर कधी तिथीची वृद्धी होते. यंदा गणेश चतुर्थी ही तृतीया दिवशी येते त्यामुळे तृतीया ते अनंत चतुर्दशी असे १२ दिवस होतात. त्यामुळे यावेळेस हा उत्सव १२ दिवसांचा असणार असल्याची माहिती पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी दिली. युट्यूब वर सुरू असलेल्या चर्चा आणि १२ दिवसांचा उत्सव हा दुर्मिळ योग वगैरे काही नाही हा केवळ अंधश्रद्धा असल्याचं सुद्धा देशपांडे यांनी सांगितलं. (Ganesh Chaturthi 2026 date and visarjan date)

भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतीची प्राणप्रतिष्ठा घरोघरी होते आणि सार्वजनिक गणपतीचे विसर्जन हे अनंत चतुर्दशीला करण्यात येतं. चतुर्थीपासून ते चतुर्दशीपर्यंत याच्या तिथी आहेत, कारण सगळे सण-वार हे तारखेवर नसून तिथीवर अवलंबून असतात. त्यामुळे चतुर्थी ते चतुर्दशी या तिथींचा समूह हा एकूण ११ तिथींचा होतो. काही वेळेला किंचित वृद्धी होत असते आणि काही वेळेला तिथीचा क्षय होतो. त्यामुळे कधी गणपती १० दिवसांचे, कधी ११ दिवसांचे असे होत असतात, असे देशपांडे यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितले.

यावर्षी १४ सप्टेंबर २०२६ ला भाद्रपद शुक्ल तृतीयेच्या दिवशी (म्हणजे हरितालिकेच्या दिवशीच) गणपती बसत आहेत. त्यामुळे तृतीयेपासूनच ही गणना आपल्याला यावर्षी करावी लागते. तृतीया ते अनंत चतुर्दशीपर्यंतचे दिवस तुम्ही मोजलेत (म्हणजे १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर), तर ते १२ दिवस होतात. त्यामुळे १२ दिवसांचा काही दुर्मिळ योग नाही. यूट्यूब किंवा इतर मीडियाच्या माध्यमातून असा अनेक वर्षांनंतर हा योग आपल्याला सांगितलेय जाते, पण तसं काहीही नाहीये, ही अंधश्रद्धा आहे. तिथीची वृद्धी आणि क्षयाचं जे लॉजिक आहे, त्यानुसार दिवसांमध्ये कमी-जास्तपणा होत असतो. त्यामुळे १२ दिवसांचा हा गणेशोत्सव काही दुर्मिळ योग यावर्षी आलेला नाही, असे देशपांडे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गेल्या पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात

PMC News : व्यसनमुक्तीच्या चळवळीला पुणे पालिकेची पोचपावती; डॉ. सोमनाथ गितेंचा विशेष सत्कार

Shocking : स्वातंत्र्यदिनी दुःखद घटना! ध्वजारोहणाच्या कार्यक्रमादरम्यान शिक्षकाचा मृत्यू; सांगलीत नेमकं काय घडलं?

Mumbai Crime: मुंबई हादरली! बायको अन् २ मुलांची हत्या, नंतर नौदल कर्मचाऱ्याने संपवलं आयुष्य

Monday Horoscope : सोमवारपासून ४ राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; तुमची रास तर यात आहे का? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT