kalyan, ganeshotsav, ganpati festival saam tv
मुंबई/पुणे

Ganpati Festival : माेरया... उत्कर्ष, झुंजार, बालगोपाळ मित्र मंडळ ठरले सर्वोत्कृष्ट गणेशाेत्सव मंडळ

या स्पर्धेमध्ये एकूण 47 मंडळांनी सहभाग घेतला होता.

Siddharth Latkar

- अभिजित देशमुख

Kalyan Ganpati Utsav : गणेशाेत्सव काळात सामाजिक उपक्रम तसेच समाजप्रबोधनपर कार्यक्रम राबवणाऱ्या गणेश मंडळांचा नुकतेच कल्याण पोलिसांनी पारितोषिक देऊन सन्मान केला. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या हस्ते मंडळांना पारितोषीक देण्यात आले. (Maharashtra News)

पाेलिस दलाने दिलेल्या माहितीनूसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उत्कृष्ट गणेशमूर्ती, उत्कृष्ट पद्धतीने राबवलेले सामाजिक उपक्रम, शिस्तबद्ध मिरवणूक, समाजप्रबोधनपर उत्कृष्ट देखावा, सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ या निकषांनुसार ही परितोषिक देऊन मंडळांना गौरवण्यात आले.

गेल्या वर्षी महात्मा फुले पोलीस ठाण्याकडून आयोजित करण्यात आली हाेती. या स्पर्धेमध्ये एकूण 47 मंडळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत समाजप्रबोधनपर देखावा सादर करणाऱ्या उत्कर्ष मित्र मंडळ ,झुंजार मित्र मंडळ ,बालगोपाळ मित्र मंडळ या मंडळांना पारिताेषिक देण्यात आले.

या कार्यक्रमास महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्यासह विविध गणेशाेत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

SCROLL FOR NEXT