Ganeshotsav 2023 change in traffic in pune city from today Saam TV
मुंबई/पुणे

Ganeshotsav 2023: पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; सायंकाळी ५ वाजेनंतर शहरातील रस्ते होणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Satish Daud

Pune Ganeshotsav 2023 Traffic Updates

गणेशोत्सवात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आजपासून म्हणजेच बुधवारपासून पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजेनंतर शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

येत्या २७ सप्टेंबरपर्यंत शहरातील सर्व (Pune News) मुख्य रस्त्यांवरील वाहतूक बंद करुन पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. शिवाजी नगर, स्वारगेट, टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, अप्पा बळवंत चौक, बाजीराव रस्ता या मुख्य मार्गांच्या वाहतुकीत हे बदल करण्यात आले आहेत.

वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून (Police) करण्यात आले आहेत. हे वाहतूक बदल विसर्जन मिरवणुकीपर्यंत लागू राहणार आहे. दुसरीकडे गणेशोत्सवात भाविकांसाठी शहरात अनेक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील २६ ठिकाणी पार्किंग स्टँड उभारण्यात आले आहे.

दुचाकीसाठी पार्किंगसाठी वाहनतळ

- न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग

- देसाई महाविद्यालय (पोलिसांच्या वाहनांसाठी)

- गोगटे प्रशाला

- स.प. महाविद्यालय

- शिवाजी मराठा विद्यालय

- नातूबाग

- सारसबाग, पेशवे पार्क

- हरजीवन रुग्णालयासमोर, सावरकर चौक

- पाटील प्लाझा पार्किंग

- मित्रमंडळ सभागृह

- पर्वती ते दांडेकर पूल

- दांडेकर पूल ते गणेश मळा

- गणेश मळा ते राजाराम पूल

- विमलाबाई गरवारे हायस्कूल

- आपटे प्रशाला

- मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालय

- एसएसपीएमएस महाविद्यालय

दुचाकी आणि चारचाकीसाठी वाहनतळ

- शिवाजी आखाडा वाहनतळ

- हमालवाडा, पत्र्या मारुती चौकाजवळ

- नदीपात्रालगत

- पीएमपी मैदान, पूरम चौकाजवळ

- नीलायम टॉकीज

- आबासाहेब गरवारे महाविद्यालय

- संजीवन वैद्यकीय महाविद्यालय

- फर्ग्युसन महाविद्यालय

- जैन वसतिगृह, बीएमसीसी रस्ता.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Personality Development: अधिक आत्मविश्वास आणि आकर्षक होण्यासाठी 7 मार्ग

Maharashtra News Live Updates: सलमान खानला मारण्याची सुपारी घेणाऱ्याला पनवेल कोर्टात केलं हजर

Hansika Motwani Home: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो पाहिलेत का?

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी स्पेशल; साखरेएवजी 'हा' पदार्थ वापरुन बनवा हेल्दी लाडू

SCROLL FOR NEXT