Ganesh Visarjan 2025  Saam
मुंबई/पुणे

'निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी...' गणेश गल्ली, तेजुकाया अन्.. मुंबईतील गणरायाच्या विसर्जनाला सुरूवात

Ganesh Visarjan 2025: राज्यभर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. मुंबईत लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा यांसह प्रमुख मंडळांची मिरवणूक मार्गस्थ.

Bhagyashree Kamble

  • राज्यभर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.

  • मुंबईत लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा यांसह प्रमुख मंडळांची मिरवणूक मार्गस्थ.

  • ढोल-ताशा, टाळ-मृदंग आणि जयघोषांनी संपूर्ण मुंबई दुमदुमली.

  • पोलिस आणि महानगरपालिका विसर्जन सोहळ्यासाठी सज्ज.

'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या'. या गजरात आज राज्यभरातील गणेशभक्त आपल्या लाडल्या गणरायाला निरोप देतील. १० दिवसांच्या भक्ती, उत्साह आणि आनंदानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. मुंबईतही सावर्जनिक मंडळातील गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. तसेच घरगुती गणपतींना देखील आज निरोप दिला जाणार आहे. मुंबईत भव्य दिव्य सोहळ्यासाठी मुंबई पोलीस आणि महानगरपालिका सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आज अनंच चतुर्दशी. राज्यभरात दहा दिवसांच्या गणरायाला मनोभावे निरोप दिला जात आहे. या उत्सवाच्या पारंपारिक सोहळा आणि जल्लोषात मुंबईकर सज्ज झाले आहेत. मुंबईतील गणेशगल्लीतील मुंबईचा राजाही विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे.

गणेश गल्ली अर्थात मुंबईच्या राजाची सकाळीच आरती झाली. यानंतर विसर्जनासाठी मुंबईचा राजा मार्गस्थ झाला आहे. विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली असून, भक्तीभावाने निरोप दिला जात आहे. ढोल ताशांचा गजर, टाळ - मृदंगाचा निनाद, गणरायांच्या घोषणांनी संपूर्ण मुंबई दुमदुमली आहे.

तेजुकाया सार्वजनिक मंडळ तसेच परळचा राजाची देखील विसर्जन मिरवणूकीला सुरूवात झाली आहे. मात्र, लालबागच्या राजाचे विसर्जन मिरवणूक सकाळी १० वाजेनंतर सुरू होणार आहे. गणरायाच्या विसर्जनासाठी मुंबईकर सज्ज झाले असून, आजचा दिवस भावनांचा, भक्तीचा आणि निरोपाचा सोहळा ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT