Konkan Alternatives Route Saam Tv
मुंबई/पुणे

Konkan Alternatives Route: गणेशोत्सवासाठी कोकणात जाताय? पुणे, कोल्हापूर आणि कुठून आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या...

Ganesh Utsav 2023: गणेशोत्सवासाठी कोकणात जाताय? पुणे, कोल्हापूर आणि कुठून आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या...

Satish Kengar

Konkan Alternatives Route:

गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात कोकणातील चाकरमानी जे मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये आहेत, ते गावाकडे येतात. यातच मुंबई-गोवा महामार्गावर गणेशभक्तांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.

अशातच तुम्ही वाहतूक कोंडी टाळून, तसेच सुरक्षित आणि कमी वेळात आपल्या गावाकडे जाता यावं, यासाठी पर्यायी मार्गाचा उपयोग करू शकता. याचबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

खोपोली-पाली – वाकण मार्ग

गणेशोत्सवासाठी कोकोकणात जाण्यासाठी तुम्ही पनवेल शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कळंबोली-पनवेल बायपास ते पळस्पे फाटा आणि मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरून खोपोली-पाली – वाकण मार्गाचा वापर करू शकता. (Latest Marathi News)

रत्नागिरी, सिंधुदुर्गात आणि चिपळूणला जाण्यासाठी कोणते आहेत पर्यायी मार्ग?

रत्नागिरी, सिंधुदुर्गात आणि चिपळूणला जाण्यासाठी मुंबई पुणे एक्स्प्रेस वे मार्गे सातारा-उंब्रज-पाटण- कोयना नगर- कुंभार्ली घाट मार्गे खेर्डी-चिपळून रस्त्याचा वापर करू शकतात. तसेच हातखंबा येथे जाणाऱ्यांनी मुंबई पुणे एक्स्प्रेस वे मार्गे सातारा-कराड-वाठार-टोप- मलकापूर-शाहूवाडी- आंबाघाट मार्गे लांजा – राजापूर मार्गाचा वापर करू शकतात.  (Utility News)

कणकवली

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे मार्गे सातारा-कराड-कोल्हापूर शहरातून रंकाळा तलावावरून कळे-गगनबावडा घाट मार्गे वैभववाडीहून कणकवली जात येऊ शकतं.

सावंतवाडी

मुंबई येथून सावंतवाडी गाठण्यासाठी मुंबई पुणे एक्स्प्रेस वे मार्गे सातारा- कराड-कोल्हापूर-निपाणी- आजरा-आंबोली घाट मार्गे सावंतवाडीला जाऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sushil Kedia: ठाकरे काय करायचं बोल? राज ठाकरेंना टॅग करत उद्योजक सुशील केडियांची धमकी| VIDEO

Eknath Shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

SCROLL FOR NEXT