Ganesh Naik and Eknath Shinde locked in a fierce political face-off ahead of Navi Mumbai civic polls Saam Tv
मुंबई/पुणे

नाईक करणार शिंदेंचे घोडे बेपत्ता? नवी निवडणूक, जुनी दुश्मनी

Ganesh Naik Vs Eknath Shinde Navi Mumbai Election Conflict: आनंद दिघेंपासून सुरु असलेला नाईक विरुद्ध शिंदे संघर्ष आता नव्या वळणावर आलाय.. गणेश नाईकांनी थेट शिंदेंचा टांगा पल्टी करण्याचा इशारा दिलाय... त्यावरुन कसं राजकारण तापलंय..

Bharat Mohalkar

ऐकलंत...ठाकरेसेनेला डिवचण्यासाठी एकनाथ शिंदे आपल्या अनेक भाषणांमध्ये हा डायलॉग बोलल्याशिवाय राहत नाही....मात्र आता त्यांची हीच टोलेबाजी त्यांच्या मित्रपक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावरच उलटवलीय. नवी मंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीतच काँटे की टक्कर रंगलीय.. भाजपचे मंत्री गणेशन नाईकांनी तर थेट एकनाथ शिंदेंचा टांगा पल्टी करुन घोडे बेपत्ता करण्याचा इशारा दिलाय... त्यामुळे नाईक विरुद्ध शिंदे यांच्यातील जुन्या दुश्मनीला नवा रंग चढलाय.... तर शिंदेसेनेचे मंत्री शंभुराज देसाईंनीही गणेश नाईकांच्या टीकेला जशास तसं उत्तर दिलंय..

खरंतर एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील संघर्ष जुना आहे.. त्यातच महायुती सत्तेत आल्यानंतर भाजपनं शिंदेंना शह देण्यासाठी नाईकांना ताकद दिली... आणि त्यामुळेच नाईक-शिंदे संघर्षाची ठिणगी पडली..मात्र नवी मुंबई महापालिकेत शिंदेसेनेनं भाजपसोबत युती करण्याचा प्रयत्न केला तो फेल ठरला.. त्यानंतर शिंदेंनी नवी मुंबईत जाऊन नाईकांना आव्हान देत परिवर्तनाचा नारा दिला... त्यामुळे नाईक आणखीच चिडलेत..

नवी मुंबई महापालिकेत 111 नगरसेवक आहेत... त्यापैकी गणेश नाईकांच्या नेतृत्वातील तत्कालीन राष्ट्रवादीचे 52, संयुक्त शिवसेनेचे 38, काँग्रेस 10 तर भाजपचे 6 नगरसेवक होते..

मात्र 2019 मध्ये नाईकांनी भाजपमध्ये प्रवेश केला..आणि त्यांच्यासोबत नवी मुंबईची सत्ताही भाजरपच्या ताब्यात आली.

नवी मुंबईत गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे हा संघर्ष तीव्र झाल्यानं मतदार शिंदेंचा टांगा पल्टी करणार की नाईकांचा? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिक दत्तक घेणाऱ्या फडणवीसांनी काय केलं? राज ठाकरेंच्या टीकेनंतर देवाभाऊंनी यादीच वाचून दाखवली|VIDEO

Maharashtra Live News Update : जळगाव महापालिका निवडणुकीतील प्रभाग पाच मधील ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवाराचा चक्क अपक्ष उमेदवाराला पाठिंबा..

Love Tragedy : प्रेमाचा दुर्दैवी अंत! धावत्या वंदे भारत एक्सप्रेससमोर उडी मारून प्रेमीयुगुलाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण आलं समोर

Daily Wear Saree Designs: डेली वेअरसाठी या आहेत युनिक आणि ट्रेडिंग 5 साड्या

Daily Yoga Workout: फिट राहण्यासाठी रोज करा हे 4 योगा

SCROLL FOR NEXT