Ganesh festival  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local : मुंबईतील लोकल गर्दी कशी कमी होणार? डोंबिवलीतील कुटुंबीयांनी गणेशोत्सवाच्या देखाव्यातून दिला महत्वाचा संदेश, वाचा

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण : मुंबईतील लोकल ट्रेन म्हटलं तर प्रवाशांची गर्दी आलीच. या लोकल गर्दीतूनच प्रवाशांना तासंतास प्रवास करावा लागतो. कर्जत ते डोंबिवली दरम्यान राहणाऱ्या प्रवाशांना लोकलने गर्दीतूनच कार्यालय गाठावं लागतं. या लोकल गर्दीत प्रवास करताना प्रवाशांची दमछाक होते. त्यामुळे हजारो प्रवासी या प्रवासाला त्रस्त झाले आहेत. या लोकल गर्दीवरुन गणेशभक्त कुटुंबीयांनी गणेशोत्सवाच्या देखाव्यातून सरकारला उपाय सुचवला आहे.

कल्याण-डोंबिवली परिसरात गणोशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा केला जातो. यावेळी विविध मंडळे आणि घरगुती बाप्पाकडून समाजाला वेगवेगळा संदेश दिला जात आहे. डोंबिवलीतील ९० फिट रोडवरील बालाजी अंगण सोसायटीत राहणारे रुपेश राऊत आणि त्यांचे कुटुंबीय यंदा त्यांच्या घरातील बाप्पाच्या देखाव्यातून माध्यमातून एक महत्वाच संदेश देत आहेत. डोंबिवलीतील राऊत कुटुंबायांनी यंदा डोंबिलीत लोकल ट्रेनमधील वाढत्या गर्दीची समस्या उचलून धरली आहे.

राऊत कुटुंबीयांनी गणेशोत्सवाच्या देखाव्यातून संदेश देत म्हटलं की, 'लोकल गर्दीमुळे आजतायगायत अनेक बळी गेले आहेत. त्यामुळे फक्त लोकलच्या फेऱ्या वाढवून प्रश्न सुटणार नाही. यावर उपाय म्हणजे डोंबिवलीत रोजगार निर्मिती करणे होय'.

'राऊत कुटुंबीयांच्या मते, जर डोंबिवलीत एक मोठे आयटी पार्क उभारले गेले तर लोकांना मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही. यामुळे लोकल गर्दी आपोआप कमी होईल. सांस्कृतिक डोंबिवलीसोबत आधुकनिक तंत्रज्ञानाची ओळख असणारी डोंबिवली उभारण्याची काळाची गरज आहे, असे राऊत यांनी सांगितले. त्यांचा गणेशोत्सवाचा देखावा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

ऐन गणेशोत्सवात लोकलचा खोळंबा

ऐन गणेशोत्सवात आज सकाळी मुंबई लोकलची वाहतूक खोळंबली. मध्यम आणि पश्चिम मार्गावरील लोकल ट्रेन तब्बल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती मिळाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर निघालेल्या लोकांचा लेटमार्क लागणार आहे. लोकल ट्रेन उशिराने असल्याने रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी आहे. लोकल ट्रेन उशिराने असल्याने प्रवास प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT