Ramdas kadam  saam Tv
मुंबई/पुणे

Kadam vs kritikar: वाद १०० टक्के मिटला; मी आणि गजाभाई कसलाही राजकीय वाद घालणार नाही: रामदास कदम

Kadam vs kritikar: रामदास कदम यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

Bharat Jadhav

Ramdas Kadam and kritikar clashes :

शिंदे गटाच्या नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळे राजकाराणात वेगळीच दिवाळी साजरी झाली. फटाके फोडल्यामुळे मुंबईतील हवा प्रदूषित झाली. त्यात रामदास कदम आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी एकमेकांवर केलेल्या कंबरे खालच्या आरोपामुळे राजकारणातील वातावरण देखील गढूळ झालं होतं. (Latest News)

दोन दिवसांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. या नेत्यांच्या वादावर पदडा टाकण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी रामदास कदम आणि किर्तीकर यांच्याशी चर्चा केली. आज रामदास कदम यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्याची भेट घेतल्यानंतर गजानन किर्तीकर आणि आपल्यातील वाद मिटल्याचं रामदास कदम यांनी स्पष्ट केलं. खासदार गजानन कीर्तिकर यांच्यासोबत सुरु झालेला वाद आता १०० टक्के मिटला असल्याचं कदम म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांच्यामध्ये दिवाळीत फटाके फूटत होते. तर काही नेत्यांना शिमगादेखील पाहायला मिळाला. तो भविष्यामध्ये या दोन नेत्यांकडून होणार नाही. काल गजाभाऊंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मीही मुख्यमंत्र्यांना सांगितलं की त्यांनी आधी तुमच्याकडे यावं, थेट माध्यमांकडे जाऊ नये. अशा सूचना गजाभाऊंना द्यावात, अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं कदम माध्यमांशी बोलताना म्हणाले.

नवीन पक्ष असून अनेकजण विश्वास ठेवून पक्षात आलेत. ग्रामपंचायतमध्ये उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. त्यात दोन नेत्यांमध्ये वादावादी सुरू असणं हे चांगलं नाही. याची जाणीव मलादेखील आहे. भविष्यात दोघांकडून अशाप्रकारचं काही होणार नाही. भविष्यात आमच्यात राजकीय वाद होणार नाहीत. असं बोलताना त्यांनी प्रेस नोट काढणं कितपत योग्य असा सवाल देखील केला.

निष्ठावान म्हणून महाराष्ट्र मला पाहतो. त्यामुळे रामदास कदमांना राजकारणातून संपवण्यासाठी एखादी प्रेसनोट काढणं कितपत योग्य आहे. गद्दार म्हणणं कितपत योग्य आहे, असा रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना केला. मी आयुष्यात कधी कंबरेच्या खाली वार केला नव्हता. पण कालच्या प्रकरणामध्ये मी केला. कारण त्यांनी अनेक खोटे आरोप केले. बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला, असं होत नाही. त्यामुळे ज्याचं जळतं त्याला कळतं, कदम सवाल करताना म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

SCROLL FOR NEXT