Chhattisgarh Election: 'मी तुरुंगात जायला घाबरत नाही', महादेव अॅपच्या मुद्द्यावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल स्पष्टच म्हणाले...

Bhupesh Baghel : 'मी तुरुंगात जायला घाबरत नाही', महादेव अॅपच्या मुद्द्यावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल स्पष्टच म्हणाले...
Chhattisgarh Assembly Election 2023
Chhattisgarh Assembly Election 2023Saam Tv
Published On

Chhattisgarh CM Bhupesh Baghel:

छत्तीसगडमधील निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर महादेव बेटिंग अॅपच्या प्रवर्तकांकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हा दावा केला आहे. या आरोपांदरम्यान भूपेश बघेल यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र आता खुद्द बघेल यांनी या आरोपांना उत्तर देताना आपल्याला तुरुंगात जाण्याची भीती नसल्याचं म्हटलं आहे.

न्यूज 24 ला दिलेल्या विशेष मुलाखतीत भूपेश बघेल म्हणाले, ईडी निवडक लोकांवर कारवाई करत आहे. पैशांसह पकडलेला असीम दास हा भाजपचा कार्यकर्ता आहे. पकडण्यात आलेले वाहन माजी मंत्री अमर अग्रवाल यांच्या भावाचे आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chhattisgarh Assembly Election 2023
Who Is Jyoti Waghmare: ठाकरेंना नेहमीच फैलावर घेणारी 'ही' महिला कोण आहे?

बघेल म्हणाले की, ''महादेव अॅपचा मालक असल्याचा दावा करणाऱ्या शुभम सोनीला मी कधीही भेटलो नाही. मला सांगा, कोणताही बॉस त्याच्या नोकरासाठी 200 कोटी रुपये खर्च करतो का? रवी उप्पल आणि सौरभ चंद्राकर यांचा त्याच्याशी काय संबंध आहे, हा तपासाचा विषय आहे.'' (Latest Marathi News)

'शुभम सोनी यांना मी कधीही भेटलो नाही'

मुख्यमंत्री बघेल पुढे म्हणाले, ''मी शुभम सोनी याला कधीही भेटलो नाही. बैठक झाली असती तर इतक्या दिवसात एक तर व्हिडिओ समोर आला असता. महादेव अॅप प्रकरणात कुठेही कारवाई झाली असेल, तर छत्तीसगडमध्ये सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. भाजप सरकारच्या काळात राज्यांमध्येही कारवाई होत नाही.''

Chhattisgarh Assembly Election 2023
Thackeray Vs Shinde: 'या' बाबतीत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मागे टाकलंय...

भूपेश बघेल यांनी ही पूर्णपणे भाजपची स्क्रिप्ट असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, भाजपने त्याची स्क्रिप्ट लिहिली आहे. ईडी म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे ईडी, अदानींना छत्तीसगड सरकारशीही अडचण, म्हणून या कारवाई होत आहे.

'मला तुरुंगात जाण्याची भीती नाही'

जेव्हा त्यांना विचारण्यात आले की काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी अदानी यांची भेट घेतली होती का? तर याला उत्तर देताना बघेल म्हणाले, दिलेल्या सर्व खाणी रमण सिंह यांच्या काळात दिल्या होत्या. आम्ही अदानीसोबत कोणताही करार केलेला नाही. तुम्हाला अटकेची भीती वाटते का? या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, रमण सिंह यांनी मला 15 वर्षे तुरुंगात टाकले, ते 15 जागांवर आले आहेत. मला तुरुंगात जाण्याची भीती वाटत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com