Who Is Jyoti Waghmare: ठाकरेंना नेहमीच फैलावर घेणारी 'ही' महिला कोण आहे?

Jyoti Waghmare News: ठाकरेंना नेहमीच फैलावर घेणारी 'ही' महिला कोण आहे?
Who Is Jyoti Waghmare
Who Is Jyoti Waghmare Saam Tv
Published On

>> मयूर सावंत

Who Is Jyoti Waghmare:

मुंब्र्यात शिवसेना शाखेवरून ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने भिडले. यावेळी शिंदे गटातील नेत्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आणि ठाकरेंना शाखा पाहू न देताच, परतावून लावलं. यावेळी ठाकरेंनी इलेक्शनचा मुद्दा उपस्थित करत शिंदे गटाला इशारा दिला. पण ठाकरेंच्या या इशाऱ्याला न जुमानता ज्योती वाघमारे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं. ते आले, त्यांनी पाहिलं आणि गाडीत बसून पळून गेले, असं म्हणत ज्योती वाघमारे यांनी ठाकरेंना डिवचलं.

गेल्या दोन दिवसांपासून ज्योती वाघमारे ठाकरे गटावर सतत टीका करता आहेत. पण ठाकरेंना नेहमीच फैलावर घेणाऱ्या शिंदे गटाच्या या नेत्या कोण आहेत, हेच आपण जाणून घेणार आहोत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Who Is Jyoti Waghmare
PM-PVTG काय आहे? ज्यावर मोदी सरकार 2400 कोटी रुपये खर्च करणार; विधानसभा निवडणुकांवर होणार परिणाम?

कोण आहेत ज्योती वाघमारे?

ज्योती वाघमारे या शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत. आंबेडकरी चळवळीत काम करणारा चेहरा म्हणून ज्योती वाघमारे यांची ओळख आहे. ज्योती वाघमारे यांच्या वडिलांचं नाव नागनाथ वाघमारे आहे. नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे कार्यकर्ते असल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

ज्योती वाघमारे यांची सामाजिक आणि आंबेडकरी चळवळीच्या माध्यमांतून कार्याला सुरूवात झाली. वालचंद कॉलेजमध्ये त्या प्राध्यापिका होत्या. मराठीवर प्रभुत्व असल्याने त्यांनी आपल्या वक्तृत्वातून अनेक मंच गाजवले आहेत. २०१४ साली काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Who Is Jyoti Waghmare
Thackeray Vs Shinde: 'या' बाबतीत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मागे टाकलंय...

सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्ष म्हणून काम केलं. शिवसेना फुटीनंतर वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटाकडून शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या आणि धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com