Mumbai Covid Management Saam Tv News
मुंबई/पुणे

Mumbai: भूसंपदानासाठी राखून ठेवलेला निधी आता कोविड व्यवस्थापनासाठी...

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: कोविडचा प्रादूर्भाव सुरू झाल्यापासून मुंबईतील (Mumbai) अनेक योजना आणि विभागांसाठी राखून ठेवलेला निधी सध्या आकस्मित निधी म्हणून कोविड व्यवस्थापनासाठी वापरला जात आहे. या आर्थिक वर्षात कोविड (Covid-19) व्यवस्थापनावर आतापर्यंत १ हजार ३०३ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. तर येत्या काळात या व्यवस्थापनासाठी आणखी ३०० कोटी रुपये लागणार असून ते भूसंपादनासाठी (Land Acquisition) राखून ठवलेला निधी (Funds) वापरण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर प्रशासनाने ठेवला आहे. तर याआधी देखील ४०० कोटी रुपये देखील असाच आकस्मित निधीतून पालिकेने उपलब्ध करून घेतला होता. (The funds set aside for land acquisition will now be used by the corporation for covid management)

हे देखील पहा -

कोविड काळातील आगामी व्यवस्थापनासाठी लागणारा खर्च वेगवगेळ्या उपययोजनांनावर देखील खर्च केला जाणार आहे. यापैकी मालाड कोविड केंद्रात प्राणवायूचा प्रत्येक रुग्णशय्येपर्यंत पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन व्यवस्था बसवली जाणार असून त्यासाठी १ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तसा प्रस्ताव देखील स्थायी समितीकडे प्रशासनाने सादर केला आहे. त्याचबरोबर मालाड येथील जंम्बो कोविड केंद्रातील विद्युत वाहिन्या, विद्युत उपकरणात शॉर्ट सर्किट होऊन आगाची धोका कमी करण्यासाठी महानगरपालिका (BMC) 'इलेक्ट्रो मॅग्नेटिक सेन्सर सिस्टीम' बसवणार आहे. त्यासाठी ८५ लाख रुपयांचा खर्च होणार आहे. या जंम्बो कोविड केंद्रासाठी अग्नी सुरक्षा प्रमाणपत्र मिळणे आवश्‍यक आहे. तज्ञांच्या शिफारशीनुसार ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे .

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

SCROLL FOR NEXT