Manasvi Choudhary
फलटण या शहाराला जुना ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
पूर्वी या ठिकाणी भरपूर फळांची शेती होत होती यामुळे या गावाला फलस्थान अशी ओळख मिळाली.
फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याशी शिवरायाचं जुना इतिहास आहे. सईबाई आणि दिपाबाई या कन्या शिवाजी व मालोजी राजांना दिल्या होत्या.
फलटण शहारातील श्रीराम मंदिर हे फलटण शहराचे भूषण आहे. श्रीराम मंदिराच्यालगत राधाकृष्ण, दत्त, गरूड आणि उत्तरेला दत्तात्रय मंदिर आहे.
फलटण येथे शीवकालीन किल्ले, गड आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात उभारलेला किल्ला आहे ज्याचं नाव किल्ले ताथवडा असं आहे.
निसर्ग, शांत वातावरण आणि इतिहास या ठिकाणाला लाभलेला आहे.