School Picnic Tragedy Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai News: वॉटरपार्क सहल जीवावर बेतली! शाळेच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याचा बळी?

School Picnic Tragedy: तुम्ही मुलांना सहलीला पाठवत असाल तर सावध व्हा,कारण, नवी मुंबईत महापालिकेच्या शाळेतील मुलांची सहल रखरखत्या उन्हात वॉटर पार्कला नेण्यात आली होती.

Tanvi Pol

Special Report: खोपोली नजिकच्या वॉटर पार्कला नवी मुंबईतील मनपा शाळा क्रमांक 76ची पिकनिक गेली होती.वॉटर पार्कला जायचं म्हणून आठवीत शिकणारा आयुष सिंगही आनंदात होता. पिकनिकला जायची सगळी तयारी त्यानं आदल्या रात्री करुन ठेवली.सकाळी लवकर उठला.मित्रांसोबत सहलीला जायचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

आय़ुषनं वॉटर पार्कमधील राईडवरुन धम्माल केली.संध्याकाळपर्यंत सगळं काही छान चाललं होतं.मात्र साडेपाचच्या सुमारास अचानक आयुषला त्रास झाला. त्याला उलटी झाली आणि तो बेशुद्ध झाला.अचानक आयुषला काय झालं म्हणून अवतीभोवती मित्रांनीही गर्दी (Crowd)केली.तातडीनं आयुषला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी आयुषला मृत घोषित केलं.

मात्र खरा सवाल इथंच उपस्थित होतो.सरकारचे नियम डावलून महापालिकेच्या शाळेनं पिकनिक अडवेंचर पार्कला का नेली? २०१७ मधील शासकीय आदेशानुसार शालेय विद्यार्थ्यांच्या सहली वॉटरपार्कला नेण्यावर निर्बंध घालण्यात आलेत,त्यामुळे शाळेला वॉटर पार्कला सहल नेण्याची परवानगी कुणी दिली? हाच सवाल मनसे नेते गजानन काळे यांनीही उपस्थित करत शिक्षण विभागाला धारेवर धरलंय.

आयुषच्या मृत्यूला एकप्रकारे शाळा (School)प्रशासनचं जबाबदार असल्याचा आरोप संतप्त पालकांकडून केला जातोय. शिक्षण विभागाचे नियम धाब्यावर बसवून मुलांच्या जीवाशी खेळ कोण करतंय? मुळात शाळेनं विद्यार्थ्याची काळजी का घेतली नाही असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT