pune news Saam tv
मुंबई/पुणे

सोशल मीडियाचे 'स्टार' निवडणुकीत 'गार'; लाईक्स मिळाले पण मतांची बोंब, VIDEO

pune municipal election : लाखात VIEWS असणाऱ्या सोशल मीडिया स्टार्सना महापालिका निवडणुकीच्या रिंगणात फक्त हजारात मतं मिळालेत... त्यामुळे सोशल मीडिया स्टार्सना मतदारांनी कसं नाकारलं ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीने यंदा अनेकांना धक्का दिलाय...रिल्सच्या दुनियेत 'किंग' आणि 'क्वीन' असणारे अनेक नेते निवडणुकीच्या रिंगणात मात्र अपय़शी ठरलेत... सोशल मीडियावर लाखांच्या घरात फॉलोअर्स आहेत आणि ज्यांच्या एका रीलला लाखो व्ह्यूज मिळतात, अशा बड्या नेत्यांना पुणेकरांनी नाकारलयं...यंदा पुणेकरांचं दोन चेहऱ्यांकडे लक्ष लागलं होतं. ते म्हणजे ठाकरेसेनेचे वसंत मोरे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांच्या प्रभागाकडे... मात्र या नेत्यांना पुणेकरांनी पसंती दिली का? पाहूयात...

आक्रमक भूमिका बजावणाऱ्या अजित पवारांच्या खांद्या समर्थक असणाऱ्या रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 फॉलोवर्स आहेत... तर इंस्टाग्रामवर 74 हजार 500 फॉलोवर्स आहेत... त्यात रुपाली ठोंबरेंनी प्रभाग 25 आणि प्रभाग 26 मधून निवडणुक लढवली...त्यात प्रभाग 25 मधून त्यांचा 18 हजार 455 मतांनी पराभव झाला... तर प्रभाग 26 मधून ठोंबरेंना 9094 मतं मिळाली...

तर पुणे महापालिकेत दुसरी हाय व्होल्टेज लढत म्हणजे ठाकरे सेनेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांची... वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख 24 हजार फॉलोवर्स आहेत. तर इंस्टाग्रामवर 1 लाख 43 हजार फॉलोवर्स....मात्र त्यांना प्रभाग क्रमांक 38 मधून फक्त निवडणुकीत 20 हजार 854 मतं मिळालेत....

पुणे महापालिकेच्या या निकालाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की, सोशल मीडियावरील 'लाईक्स' आणि 'शेअर्स' म्हणजे प्रत्यक्ष 'मतं' नव्हेत. स्क्रीनवरची लोकप्रियता आणि निवडणुकीच्या मैदानात थेट मतदारांशी असणारा जनसंपर्क, तुम्ही किती कामे केलीत यात मोठं अंतर आहे... त्यात पुणेकरांनी उमेदवाराच्या अनुभवाला आणि कामाला पसंती दिलीय... त्यामुळे सोशल मीडिया स्टार्सना आता आत्मचिंतन करण्याची गरज अधोरेखित होतेय....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या आमदार अन् माजी महापौरात राडा; MLAच्या समर्थकांकडून महापौर विलास पाटलांच्या घरावर हल्ला

महापालिकांवर 'GEN Z'चा झेंडा; मुंबई महापालिकेतही घुमणार तरुणाईचा आवाज

Monday Horoscope : कामात धोका पत्करल्यास अडचणी येऊ शकतात; ५ राशींच्या लोकांनी कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यावी, अन्यथा...

India vs New Zealand 3rd ODI: विराट कोहलीचं शतक व्यर्थ; टीम इंडियाचा इंदूर वनडेमध्ये दारूण पराभव,न्यूझीलंडने रचला इतिहास

धाड धाड...! मुंबई हादरली, भररस्त्यात तरुणांकडून गोळीबार; नागरिक दहशतीत

SCROLL FOR NEXT