कल्याण : 'एमएमआरडीए'नेMMRDA मंजूर केलेले 360 कोटी रस्त्याच्या राजकारणात भाजप आमदार गणपत गायकवाडBJP MLA Ganpat Gaikwad यांनी सुद्धा उडी मारली आणि सत्ताधारी शिवसेनेवरShivsena टीका केली.या टीकेला आता शिवसेनेकडून उत्तर दिले जात आहेत.From MMRDA's road works, Sena-BJP clash
हे देखील पहा-
आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले की आपण जर बघितले असेल तर, माझी जुनी काम होती.त्याच जुन्या कामांना नवी नावं देऊन नवीन निधी मंजूर केला असं दाखवण्यात आलं आहे. मात्र कल्याण पूर्व मध्ये जो काही निधी आला आहे, तो खूप कमी असून जो 123 कोटींचा निधीfund मीच आधीच मंजूर करून आणला होता. त्या रस्त्याच्या कामाला नवीन नाव देऊन नवीन मंजुऱ्या आणल्या आहेत.
आता आमदार गणपत गायकवाड यांच्या या आरोपास शिवसेनेचे गोपाळ लांडगे Gopal Landge आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी उत्तर दिले आहे.लांडगे यांनी सांगितले की खोटे बोला पण रेटून बोला ही भाजपची सवयच आहे. त्यांनी जर निधी मंजूर केला होता.तर त्यांचे हात 5 वर्ष कोणी बांधून ठेवले होते.माजी मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या असलेल्या आमदारांना एकही विकास काम केलेले नाही. 360 कोटीच्या निधीसाठी केवळ खासदारांनी प्रयत्न केले होते,ते त्यांनी मंजूर केले आहेत.तर माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी सांगितले की आमदार सक्षम नाही हे त्यांनी स्वतःच यातून कबुली दिल्याचे येते.कोणताही विकास त्यांनी केल्यामुळे,आमच्या कडील शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी खासदार शिंदे यांच्या निर्दशनास आणून दिले आणि तो निधी त्यांनी मंजूर करून आणला.आता याचे काम लवकरात लवकर सुरू होणार असून आता याचे श्रेय घेऊ नये.
आता ह्या रस्त्याची कामे कधी सुरू होणार असे प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. त्यामुळे काम तर दूरच, निधीवरुन शिवसेना-भाजप-मनसेत जोरदार जुंपली असल्याचे चित्र कल्याण-डोंबिवलीKalyan-Dombivali दिसून येत आहे.
Edited By-Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.