आजपासून राज्यात 'या' वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू

 

Saam Tv

मुंबई/पुणे

आजपासून राज्यात 'या' वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू

आजपासून राज्यात ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - आजपासून राज्यात ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. याशिवाय या मोहिमेसोबतच ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

 तर १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली असून त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणाच्या योजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केला आहे.

हे देखील पहा -

शासकीय लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी ऑनलाइन पूर्वनोंदणी आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन देखील करता येणार आहे.३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सत्रांचे नियोजन करण्याकरिता कोविन अॅपमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. दुसरी लाट ओसरत असल्यामुळे आता लोक घराबाहेर पडू लागले आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरण युद्धपातळीवर राबवणे गरजेचे आहे. तसे प्रयत्न विविध जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाकडून केले जात आहेत.  या लसीकरणा मोहिमेमुळे राज्यातील अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण होणार आहे. राज्य शासनाने लसीकरणाचे ठरवलेले लक्ष्य गाठण्यासाठी वेगाने वाटचाल करणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

Shahi Tukda Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा स्वादिष्ट शाही तुकडा,वाचा सोपी रेसिपी

Mug Cleaning Tips: बाथरुममध्ये वापरला जाणारा मग किती दिवसांनी बदलावा? डाग काढण्यासाठी जाणून घ्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT