बहिणीचा फोटो Whatsapp स्टेटसवर ठेवल्याने मित्राने मित्राच्याच पोटात भोसकला चाकू Saam Tv
मुंबई/पुणे

Crime: बहिणीचा फोटो Whatsapp स्टेटसवर ठेवल्याने मित्राने मित्राच्याच पोटात भोसकला चाकू

रोहित हा मित्रांसोबत प्रभात गार्डन येथील इमारतीच्या खाली उभा असतांना आरोपी विजय रूपानी आणि पंकज कुकरेजा याने रोहितच्या पोटात चाकू भोसकला.

अजय दुधाणे

उल्हासनगर: बहिणीचा फोटो स्टेटसवर ठेवल्याच्या रागातून मित्रानेच मित्राच्या पोटात चाकू भोसकल्याची घटना हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलीय. आता याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. (a friend stabbed by knife in friends stomach because of his friend put dp of his sister on whatsapp status)

हे देखील पहा -

यातील जखमी रोहित कांजन याने त्याचा मित्र विजय रूपानी याच्या बहिणीचा फोटो व्हाट्सएपच्या स्टेटसवर (Whatsapp Status) ठेवला होता. त्यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते. रोहित हा मित्रांसोबत प्रभात गार्डन (Prabhat Garden, Ulhasnagar) येथील इमारतीच्या खाली उभा असतांना आरोपी विजय रूपानी आणि पंकज कुकरेजा याने रोहितवर प्राणघातक हल्ला (Attack) केला. यात रोहितच्या पोटात चाकू भोसकल्याने गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर दोघेही आरोपी पसार झाले, याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात (Hill Line Police Station) ३२६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. वैद्यकीय रिपोर्ट आल्यानंतर नंतर पोलिसांनी कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

यातील आरोपी विजय आणि पंकज हे दोघेही नेताजी चौक परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती डी. बी. पथकातील बाबू जाधव आणि सुभाष घाडगे यांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात (Arrested) घेऊन गुन्ह्यातील चाकू आणि मोटारसायकल जप्त केलीय. आता ह्या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत ठाकरे हे करत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT