kalyan Politics  Saam tv
मुंबई/पुणे

कल्याणमध्ये पुन्हा मोठा राडा; भाजप उमेदवाराच्या समोरच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला? व्हिडिओ व्हायरल

kalyan Political News : कल्याणमध्ये पुन्हा मोठा राडा झालाय. भाजप उमेदवाराच्या हल्ला केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

Vishal Gangurde

कल्याणमध्ये पुन्हा राडा

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याचा आरोप

हल्ल्याच्या घटनेने परिसरातील राजकारण तापलं

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

डोंबिवलीनंतर आता कल्याण पूर्वेतही निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राजकीय वातावरण तापलं आहे. खडगोलवली परिसरात पैसे वाटपाचा आरोप करत व्हिडिओ काढणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर भाजप उमेदवाराच्या उपस्थितीत थेट हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून संपूर्ण कल्याण पूर्वेत एकच खळबळ उडाली आहे.

डोंबिवलीनंतर कल्याण पूर्वेतील खडगोलवली परिसरात राजकीय राडा झाला. पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. याचाच राग येत भाजप उमेदवार विकी तरे स्वतः घटनास्थळी दाखल झाले, शिवीगाळ करत दहशत निर्माण केली.

यानंतर विकी तरे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ३ ते ४ ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली, यात तीन जण जखमी झाले. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या प्रकरणी कल्याण पोलीस ठाण्यात चौकशी सुरू असून चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कल्याण पूर्वेतील पॅनल क्रमांक 13 मधून भाजप उमेदवार विकी तरे आणि ठाकरे गटाचे उमेदवार मधूर म्हात्रे निवडणूक लढवत आहेत.

डोंबिवलीत आरोपींच्या अटकेसाठी भाजपचा मूक मोर्चा

डोंबिवलीतील शिवसेना–भाजप हाणामारी प्रकरणाला नवे वळण लागलंय. आरोपींना अद्याप अटक न झाल्याने भाजप आक्रमक झालीये. या पार्श्वभूमीवर डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगर परिसरात भाजपकडून मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. या मूक मोर्चात भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्यासह २९ प्रभागांतील सर्व भाजप उमेदवार आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी हातावर काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला. या मारहाण प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आदित्य आणि राज ठाकरेंची भेट, नेमकी काय चर्चा झाली? VIDEO

बदलापुरात मोठा राडा; भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, कार्यालयही फोडलं, VIDEO

राजकारणातील मोठी घडामोड; शिंदे गटाची प्रकाश आंबेडकरांकडे मदतीसाठी हाक, नेमकं काय घडलं?

हातातला नायलॉन मांजा गळ्यापर्यंत! दोर पतंगाची कापायची की आयुष्याची?

डोंबिवलीत 'महायुती'त रक्ताचा सडा, पैसे वाटपावरून भाजप- शिंदेसेनेत राडा

SCROLL FOR NEXT