File Photo Saam tv
मुंबई/पुणे

Pune Road Accident: पुण्यात रस्ते अपघातांचं प्रमाण वाढलं; शहरातील 13 'ब्लॅक स्पॉट' ठरताहेत जीवघेणे, प्रवास करताना काळजी घ्या

black spot in pune: पुण्यातील १३ 'ब्लॅक स्पॉट'ची माहिती समोर आली आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे

Pune News: पुण्यात दिवसेंदिवर अपघातांचं प्रमाण वाढू लागलं आहे. शहरातील अपघातात गेल्या चार वर्षात एक हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी रस्त्यावरील प्रवास जीवघेणा ठरत आहे. पुण्यातील वाढत्या अपघातामुळे रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांमध्येही भीती वाढली आहे. याचदरम्यान, पुण्यातील १३ 'ब्लॅक स्पॉट'ची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या बस अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे राज्यभर खळबळ उडाली. त्यामुळे राज्यातील वाढत्या अपघाताबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यातही दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होत आहे. पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात आतापर्यंत शेकडो लोकांचे बळी गेले आहेत.

पुणे शहरात २०१९ पासून आत्तापर्यंत १११८ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या वर्षात आत्तापर्यंत पुणे शहरात १८० अपघातात १८९ जणांचा मृत्यू झाला आहे. दुचाकीचे शहर म्हणून पुणे शहराची ओळख आहे.

याच पुण्यात अनेक दुचाकीस्वारांचेही अपघात झाले आहेत. पुण्यातील रस्ते अपघातात आतापर्यंत शेकडो दुचाकीस्वारांचाही अपघात झाला आहे. या अपघातांना पुण्यातील ब्लॅक स्पॉट कारणीभूत ठरल्याची माहिती आहे.

पुणे शहरात ब्लॅक स्पॉट कुठे आहेत?

आय बी एम कंपनी

संचेती चौक

माई मंगेशकर हॉस्पिटल चौक

डुक्करखिंड रोड

मुठा नदी पुल रोड

खडीमशीन चौक

संगमवाडी पार्किंग

मुंढवा रेल्वे ब्रीज

भूमकर चौक

नवले पुल

टाटा गार्ड रूम चौक

५०९ चौक

कात्रज चौक

समृद्धी महामार्गावर खासगी बस वाहतुकीत घट

समृध्दी महामार्गावरील अपघाताने मार्गावरील खासगी बसची वाहतूक घटली आहे. गेल्या आठवड्यात खासगी बस अपघातानंतर प्रवाशी आणि खासगी बस चालक दहशतीत आहेत. समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर खासगी बसची वाहतूक ७० टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. तर समृद्धी महामार्गाऐवजी दुसऱ्या मार्गावरून बस नेण्याला पसंती दर्शवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Mumbai: रायगडच्या खालापुरमध्ये लागल्या वाहनांच्या रांगा

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT