Padma Shri Awardee Sindhutai Sapkal 
मुंबई/पुणे

सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेच्या नावाखाली पैशांची मागणी; काय आहे प्रकरण?

'अनाथांची माय' अशी ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांच्या संस्थेचे नाव वापरुन फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : लोकांची फसवणूक करुन पैसे उकळण्यासाठी गु्न्हेगार कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही. त्यामुळे प्रत्येकाने अशा गुन्हेगारांपासून सावध राहण्यासाठी खबरदार घेणे आवश्यक आहे. 'अनाथांची माय' अशी ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांच्या संस्थेचे नाव वापरुन लोकांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.

"द मदर ग्लोबल फाऊंडेशन" या संस्थेने अनेक गरीब मुलींचे लग्न लावून देण्यात मदत केली आहे. आमच्याकडे लग्नासाठी मुली आहेत, असे सांगून अनेकांकडून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात देखील अशारितीने फसवणूक होत असल्याची शक्यता आहे, अशी माहिती विनय सपकाळ यांनी दिली माहिती

पुण्यासह मुंबई, जळगाव, संभाजीनगर या ठिकाणी देखील असे प्रकार होत असल्याची शक्यता संस्थेने वर्तवली आहे. फसवणुकीनंतर बदलापूर या ठिकाणी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. तसेच अशा फसवणुकीला बळी न पडण्याचे आवाहान संस्थेतर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.

असेही काही प्रकार उघड झाले आहेत की, काहीजण एमआयडीसी परिसरात जातात आणि मदतीचं आवाहन करतात. त्यामुळे अशाप्रकारे कुणी मागणी केल्यास त्यांना मदत करु नका. संस्था अशाप्रकारे कोणतीही पैशाची मागणी करत नाही. त्यामुळे असा फसवणूक करणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नका असं आवाहनही संस्थेच्या वतीने करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti Tension: रवींद्र धंगेकरांवर कारवाई होणार, तर नवी मुंबईतील तोच नियम लागणार; नाईकांबाबत काय म्हणाले उदय सामंत?

गोपीनाथ मुंडेंचा वारसदार कोण? करूणा मुंडेंच्या दाव्यानं राजकीय वादळ उठलं

Maharashtra Live News Update: लोखंडवाला परिसरात अभिनेत्री खुशी मुखर्जीचा गोंधळ

Maharashtra Politics: अनिल पाटील अ‍ॅक्सीडेंटल आमदार! शिंदे गटाच्या नेत्याची खरमरीत टीका|VIDEO

Stroke: स्ट्रोक येण्याआधी शरीर देतं 'असे' संकेत

SCROLL FOR NEXT