चार वर्षीय मुलावर तीन भटक्या कुत्र्यांचा हल्ला  Saam Tv
मुंबई/पुणे

चार वर्षीय मुलावर तीन भटक्या कुत्र्यांचा हल्ला

कुत्र्यांनी घेतला 18 ठिकाणी चावा, मुलावर कळवा रुग्णालयात उपचार सुरू

प्रदीप भणगे

कल्याण - एका चार वर्षीय मुलाचा तीन भटक्या कुत्र्यांनी मिळून 18 ठिकाणी चावा घेतल्याची कल्याण पुर्वेकडील द्वारली गावात घडली आहे. नागरिकांमुळे हा मुलगा कुत्र्यांच्या तावडीतून बचावला .या मुलाला डोंबिवली शास्त्री नगर रुग्णलयात नेले असता त्या ठिकाणी उपचार करण्यासाठी डॉकटर ,औषध उपलब्द नसल्याचा आरोप  सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यानी केल्याने एकच खळबळ उडाली आहे .या जखमी मुलावर कळवा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेमुळे कल्याण डोंबिवली मध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हे देखील पहा -

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. रात्री अपरात्री ये जा करणाऱ्या नागरिकांना हे कुत्रे लक्ष करत आहेत. गेल्या नऊ महिन्यात 9 हजार 44 जणांचा चावा या कुत्र्यांनी घेतला आहे. म्हणजेच एका महिन्यात सुमारे हजार नागरिकाना कुत्रे लक्ष करत असल्याने या भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसा गणिक वाढत आहे. अशीच एक घटना कल्याण पुर्वेकडील द्वारली गावात समोर आली आहे. सुहास निंबोरे हे आपल्या कुटुंबासह द्वारली येथील आदित्य अपार्टमेंट मध्ये राहतात. काल सायंकाळच्या सुमारास त्यांचा चार वर्षाचा मुलगा  तुषार हा इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या परिसरात  खेळत होता.

याच दरम्यान तीन ते चार भटक्या कुत्र्यांनी तुषार चा दिशेने धाव घेतली तुषार वर हल्ला केला. तुषार या घटनेने घाबरला त्याने  आरडाओरडा सुरू केला. या वेळी आजूबाजूच्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ तुषार च्या दिशेने धाव घेत या कुत्र्यांच्या तावडीतुन त्याची सुटका केली मात्र तोपर्यंत या भटक्या कुत्र्यांनी त्याच्या शरीरावर 18 ठिकाणी चावा घेतला होता. तुषारचा कुटुंबीयांनी तुषारला उपचारासाठी डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात नेले मात्र रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नव्हते.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांनी तुषार ला शास्त्रीनगर रुग्णालयात नेले असता त्या ठिकाणी डॉक्टर नव्हते उपलब्ध नव्हते उपचारासाठी औषध नव्हते त्यामुळे तुषारला कळवा येथे उपचारासाठी घेऊन जावं लागलं ही बाब अत्यंत दुर्दैवी असून केडीएमसी च्या आरोग्य यंत्रने याबाबत प्रश्न उपस्थित केल आहे .दरम्यान  तुषार वर  कलवा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेमुळे कल्याण-डोंबिवली परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत कायम आहे ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

Dheeraj Deshmukh: लातूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, धीरज देशमुख यांचा पराभव

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

Maharashtra Election Result : बविआचा बालेकिल्ल्यातच भाजपकडून सुपडासाफ; हितेंद्र ठाकूर-क्षितीज ठाकूर पराभूत

SCROLL FOR NEXT