Navi Mumbai saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai : क्षणार्धात जमीनदोस्त.. पत्त्यासारखी कोसळली चार मजली इमारत (पाहा व्हिडिओ)

Building Collapsed In Navi Mumbai: या घटनेमुळे परिसरात माेठ्या प्रमाणात धुरळा झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai : उरण (uran) तालुक्यातील विंधणे गावातील दोन अनधिकृत इमारतींवर (building) सिडको नैना विभागामार्फत तोडक कारवाई सुरु हाेती. या कारवाई दरम्यान संपूर्ण इमारत पत्त्यासारखी कोसळल्याची घटना घडली आहे. त्याचा व्हिडिओ (video) सध्या समाज माध्यमात (social media) व्हायरल (viral) हाेत आहे. (Maharashtra News)

जेसीबी, पोकलेनच्या सहाय्याने इमारतीवर तोडक कारवाई सुरु असताना ही घटना घडली आहे. चार महिन्यांपासून काही जागरूक नागरिकांनी या दोन अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्याची मागणी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

यावर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांत अधिकारी यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करुन योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रांत अधिकारी यांनी पाहणी करत सदर अनधिकृत इमारत तोडण्याचे आदेश दिले.

त्यानुसार सिडको नैना विभागाने दाेन्ही इमारतीवर तोडक कारवाईला सुरुवात केली. इमारतीवर तोडक कारवाई सुरु असताना इमारतीच्या बांधकामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याने संपूर्ण चार मजली इमारत एका क्षणात कोसळल्याने एकच खळबळ उडाली. या इमारतीचा भाग जेसीबीवर पडला. या दुर्घटनेत जेसीबी चालक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lasun Khanyache Fayade: पुरूषांनी १५ दिवस रोज लसणाची १ पाकळी खाल्ली तर काय होते?

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री आज दिल्लीला रवाना; दुष्काळ आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता

राजकारणात मोठा भूकंप! काँग्रेसला जोरदार धक्का, माजी मुख्यमंत्र्यांचा २ महत्त्वाच्या पदांचा तडकाफडकी राजीनामा

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! 24, 22 अन् 18 कॅरेटचे भाव पाहा

Ganpati Festival 2026: सोमवारी लाडक्या गणरायाचे थाटामाटात आगमन होणार ! जाणून घ्या स्थापनेचा शुभ मुहूर्त

SCROLL FOR NEXT