Manasvi Choudhary
अवघ्या १ दिवसांनतर मोठ्या जल्लोषात, थाटामाटात लाडक्या गणरायाचं घरोघरी आगमन होणार आहे. लाडक्या गणरायाच्या स्वागताची सर्वत्र तयारी सुरू आहे.
तुमच्याही घरी बाप्पाचं आगमन होणार असेल तर गणरायाची स्थापना कशी करायची? स्थापना मुहूर्त आणि संपूर्ण पूजा पद्धत या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
पंचांगानुसार, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी १४ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजून ७ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच १५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजून ४३ मिनिटांपर्यंत राहील.
यंदा गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना आणि पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ वेळ सकाळी ११ वाजून २१ मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ४८ मिनिटांपर्यंत असणार आहे. या काळात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करणे अत्यंत फलदायी मानले जाते.
या वर्षी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग जुळून आले आहेत. पंचांगानुसार, १४ सप्टेंबर रोजी रवी योग, इंद्र योग आणि ब्रह्म योग तयार होत आहेत.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शन घ्या.