Manasvi Choudhary
लाडक्या गणरायाच्या आगमनाची तयारी सर्वत्र सुरू आहे. अवघ्या 2 दिवसांत घरोघरी गणरायाचे आगमन होणार आहे.
गणपतीच्या मखर सजावटीसाठी यंदा मोरपंखाची थीम तुम्ही ट्राय करा. मोरपंखाच्या रंगसंगतीमुळे मखराला सुंदर आणि आकर्षक लूक मिळेल.
गणपती डेकोरेशन मखरसाठी मोराच्या पिसांची डिझाईन करा. मोरपिसाच्या आकारा प्रमाणे पुठ्ठा कापा आणि त्यावर हिरव्या, निळ्या आणि सोनेरी रंगांच्या छटा वापरून मखर तयार करा.
मखरसाठी तुम्ही ओरिजनल मोरपंख एकत्र करून त्यांची सुंदर बॉर्डर किंवा गोलाकार कमानी तयार करा. त्यावर वॉर्म व्हाईट किंवा निळ्या रंगाची एलईडी लायटिंग लावा.
श्रीगणेशाला कमळाचे फूल अतिशय प्रिय आहे. मखराच्या मध्यभागी कमळाची गुलाबी फुले आणि वरच्या बाजूला मोरपंख लावा.
मखरासाठी पांढऱ्या, रेशमी किंवा मखमली पडदे लावा आणि त्यावर निळ्या व हिरव्या रंगाचे खडे किंवा मोराच्या पिसांची नक्षीकाम केलेले कापड वापरा.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी रंगीबेरंगी कागदाचे मोरपंखं तयार करून मखर बनवा.