Fake Certificate Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: नोकरीसाठी केला अजब धंदा, इतक्या पैशांत बनवून द्यायचे १०वी- १२वीचे बनावट प्रमाणपत्र...

Latest Crime News: नोकरीसाठी दहावी-बारावीचे बनावट प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या टोळीला चेंबूर परिसरातून अटक करण्यात आली.

Priya More

Mumbai News: सध्या बेरोजगारीचे (Unemployment) प्रमाण वाढत चालले आहे. शिक्षण कमी असल्यामुळे नोकरी मिळवण्यात तरुणांना अडचणी येत आहेत. अशामध्ये बनावट प्रमाणपत्र (Fake Certificate) मिळवण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. अशाच प्रकारचे बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) केला. याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नोकरीसाठी दहावी-बारावीचे बनावट प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या टोळीला चेंबूर परिसरातून अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या युनिट 6 ने चेंबूर परिसरातून चौघांना अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट प्रमाणपत्र, कम्प्युटर, मोबाईल फोन जप्त केले.

बनावट प्रमाणपत्र तयार करुन देण्यासाठी ही टोळी एका व्यक्तीकडून दोन ते पाच हजार रुपये घेत होती. पोलिसांनी याप्रकरणी दानिश खान, राजसाहेब हुसेन चौधरी, सलमान खान, मोहम्मद फैज शेख या चौघांना अटक केली. हे चौघे जणही चेंबूरनाका परिरात राहणारे आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे.

चारही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले. तर कोर्टाने त्यांना 18 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणात आणखी काही लोकांचा हात असण्याची शक्यता आहे. पुढील चौकशी दरम्यान त्यांनी आणखी किती लोकांना अशा प्रकारचे बनावट प्रमाणपत्र बनवून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला हे समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep deprivation: कमी झोप घेताय? शरीर देतंय धोक्याचे सिग्नल, वेळेत सांभाळा स्वतःला

Diwali Padwa Marathi Wishes: दिवाळी पाडवानिमित्त व्यक्त करा आपले प्रेम! आपल्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: पाडव्याच्या मुहूर्तावर नवा गूळ बाजारात दाखल

Pooja Sawant Photos: कानात झुमके अन् हातात हिरव्या बांगड्या, अभिनेत्री पुजाचं दिवाळी फोटोशूट

Accident News : दिवाळीत अपघाताचा थरार! भरधाव वाहनाने चौघांना चिरडलं, तिघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT