Sadichha Sane case Update : जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सदिच्छा साने हत्येप्रकरणी गुन्हे शाखेकडून काल १,७९० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले.
आरोपपत्रात सुमारे १२५ जणांची साक्ष नोंदवण्यात आली असून चार प्रमुख साक्षीदारांची साक्ष महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणी आता आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. सदिच्छा सानेची हत्या नेकमी कशी झाली याची माहिती आता उघड झाली आहे. (Latest Marathi News)
शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्याने आरोपींनी तिची हत्या केल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. आरोपींनी तिला ढकलल्याने तिचं डोकं हे खडकावर आपटलं आणि ती बेशुद्ध झाली. पोलीस कारवाई पासून वाचण्यासाठीच आरोपींनी सदिच्छाला कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट समुद्रातच लावली. या संपूर्ण प्रकरणात आत्तापर्यंत 125 जणांची साक्ष पोलिसांनी (Police) नोंदवलेली आहे
पोलिसांचा तपास भरकटवा यासाठी आरोपींनी सदिच्छाचा फोन हा एरोप्लेन मोडवर असतानाही सदिच्छाला तेरा मिस कॉल केले. तसेच स्वतःला वाचवण्यासाठी तिला इन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्याचबरोबर आरोपींनी स्वतःला वाचवण्यासाठी या सर्व गोष्टींचे स्क्रीनशॉट काढून घेतले असे अनेक वस्तुनिष्ठ पुरावे पोलिसांना तपासात मिळाले आहे.(Crime News)
याप्रकरणी मिथ्थू सिंह आणि त्याचा मित्र जब्बार अन्सारी या दोघांना अटक करण्यात आली असून ते तुरुंगात आहेत. मिथ्थू सिंह वांद्रे परिसरात चायनीज खाद्यपदार्थाची विक्री करायचा. सदिच्छा आणि मिथ्थू हे २९ नोव्हेंबर २०२१ ला रात्री बँडस्टँडवर एकत्र दिसले होते, त्यानंतर ती बेपत्ता झाली. सदिच्छा एमबीबीएसच्या (MBBS) तिसऱ्या वर्षाला शिकत होती.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.