MVA Morcha Saam Tv
मुंबई/पुणे

MVA Morcha : महाविकास आघाडीच्या आजच्या मोर्चाची चार प्रमुख कारणे...

भाजपही मविआच्या मोर्चाविरोधात प्रतिमोर्चा काढणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचंड पोलीस बंदोबस्तात हा मोर्चा पार पडणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निवृत्ती बाबर

Mahavikas Aghadi Morcha: भाजपच्या (BJP) नेत्यांकडून महापुरुषांबद्दल करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचा महामोर्चा आज १७ डिसेंबरला मुंबईत काढण्यात येणार आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. रिचर्ड्स अँड क्रूडास मिलपासून सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. महामोर्चाची तयारी पूर्ण झाली असून ठिकठिकाणी बॅनर आणि महाविकास आघाडीचे झेंडे लावण्यात आलेले आहेत.

या महामोर्चाला पोलिसांनी (Police) परवानगी दिली असली तरी राजकीय वातावरण पाहता महाविकास आघाडीच्या महामोर्चासाठी (Maha vikas Aghadi) चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. भाजपही मविआच्या मोर्चाविरोधात प्रतिमोर्चा काढणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचंड पोलीस बंदोबस्तात हा मोर्चा पार पडणार आहे. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेतली आहे. 

महाविकास आघाडीच्या आजच्या मोर्चाची चार प्रमुख कारणे...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि इतर भाजपा नेत्यांचे छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले व अन्य महापुरुषांविषयी सातत्याने केलेली बेताल वक्तव्ये.

कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्र द्रोही विधाने, सीमाप्रश्नावर इतर राज्यामध्ये सहभागी होण्यासाठीचे नागरीकांच्या कटकारस्थानास राज्य सरकारची फुस असणे.

सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची महिला आणि अन्य नेत्यांविषयीची बेताल वक्तव्य.

महाराष्ट्रातील उदयोग धंदे गुजरातला नेण्याचे कटकारस्थान करुन बेरोजगार तरुणांची केलेली फसवणुक.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

Personality Test: पहिली मुलगी दिसली की कवटी? तुमचं उत्तर उलगडणार तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

...तर वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT