Mumbai Crime News Saam TV (AI Image)
मुंबई/पुणे

मुंबईत खळबळ! माजी नगरसेविकेच्या मुलाला धक्कादायक प्रकरणात अटक; झडती घेताच पोलिसांचेही डोळे पांढरे

Mumbai Crime News: मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने माटुंगा परिसरातून ६८ ग्रॅम एमडीएमए जप्त करत एका ३९ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षाच्या (ANC) आझाद मैदान पथकाने मोठी कारवाई करत एका माजी नगरसेविकेच्या मुलाला अटक केली आहे. वसईच्या माजी नगरसेविका शिल्पा मराठे यांचा मुलगा विशाल मराठे (वय ३९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे २७ लाख ३० हजार रुपये किमतीच्या 'MDMA' (एक्स्टसी) च्या १०० गोळ्या जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट २०२६ रोजी आझाद मैदान पथक माटुंगा परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी माटुंगा (पूर्व) येथील फाइव्ह गार्डन्स परिसरातील सीमा शुल्क निवास बंगल्याजवळ (१२, एडनवाला रोड) विशाल मराठे संशयास्पद रीतीने वावरताना पोलिसांच्या निदर्शनास आला.

संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. या झडतीदरम्यान त्याच्याकडे MDMA/एक्स्टसीच्या १०० गोळ्या आढळून आल्या. जप्त केलेल्या अमली पदार्थाचे वजन सुमारे ६८ ग्रॅम असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे २७ लाख ३० हजार रुपये आहे.

या प्रकरणी आझाद मैदान पथकाने 'एनडीपीएस' (NDPS) कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून विशाल मराठे याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १२ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, जप्त करण्यात आलेले हे अमली पदार्थ विशाल मराठे याला नेमके कोणी दिले होते, ते कोणाला पुरवले जाणार होते आणि या प्रकरणामागे मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध गुन्हे शाखेकडून घेतला जात आहे. तसेच आरोपी विशाल मराठे हा अमली पदार्थांच्या एखाद्या मोठ्या तस्करांच्या जाळ्याचा भाग आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT