रवीना टंडन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासाठी मुंबईत प्रचारात सक्रिय
मशाल चिन्हासाठी दारोदारी जाऊन नागरिकांना मतदानाचे आवाहन
प्रचारादरम्यान नागरिकांचा मोठा प्रतिसाद, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
बॉलीवूड स्टारच्या सहभागामुळे ठाकरे गटाच्या प्रचाराला वेग
राज्यात महापालिकेची धामधूम सुरू असून सर्वच पक्ष आता मोठ्या ताकदीने मैदानात उतरले आहे. अवघ्या दोन दिवसांनी मतदान पार पडणार असून 29 महापालिकांवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकतो याची उत्सुकता महाराष्ट्रातील जनतेला लागली आहे. सर्वच पक्षांनी आपले स्टार प्रचारक मैदानात उतरवले असताना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने मात्र बॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्रीला उतरवल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहे.
या अभिनेत्रीने नव्वदच्या दशकात दिलवाले, मोहरा, खिलाडियोंका का खिलाडी या चित्रपटाने चाहत्यांच्या हृदयात एक वेगळेच स्थान निर्माण केले होते. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती रवीना टंडन आहे. रवीना मुंबईच्या गल्लोगल्ली जाऊन नागरिकांना मशाल चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन करत आहे. रवीनाच्या गळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा गमछा असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल होत आहे.
रवीना आल्याचे समजताच सोसायटीतील लोक मोठ्या उत्साहाने तिला भेटण्यासाठी येत आहे. ती देखील आनंदाने सर्वांशी संवाद साधत आहे. बॉलिवूडची एकेकाळची स्टार अभिनेत्रीने ठाकरेंची मशाल हाती घेतल्याने निवडणुकीत ठाकरेंना याचा कितपत फायदा होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.