Vasant More Saam Tv
मुंबई/पुणे

Vasant More Social Media Post: ग्रुपमधून काढलं पण पोरांच्या हृदयातून कसे काढणार..? वसंत मोरे यांची भावनिक पोस्ट

Vasant More Facebook Post : पुण्यातील मनसेचे माजी नेते वसंत मोरे यांनी एक भावनिक पोस्ट फेसबुकवर शेअर केलीय. या पोस्टमधून मोरे यांनी मनसे नेत्यांना प्रश्न केलाय.

Bharat Jadhav

Former MNS Leader Vasant More Social Media Post :

मनसेचे माजी नेते वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर भावनीक पोस्ट शेअर केलीय. मोरे यांनी ही पोस्ट फेसबुक पोस्ट शेअर करत मनसे नेत्यांना सवाल केलाय. दरम्यान दोन दिवसांपूर्वी त्यांनी मनसेला जय महारष्ट्र केला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राम राम ठोठकल्यानंतर अविनाश जाधव यांनी वसंत मोरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता वसंत मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट करत भावनीक सवाल केलाय. (Latest News)

मला ग्रुप मधून काढून टाकताल पण पोरांच्या हृदयातून कसे काढणार...? असा प्रश्न मनसे नेत्यांना केलाय. वसंत मोरे यांची ही भावनीक फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान मनसेला रामराम ठोकल्यानंतर वसंत मोरे काय राजकीय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वसंत मोरे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे. वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचं म्हटलं आहे. मात्र ते कोणत्या पक्षातून लढणार की अपक्ष निवडणूक लढवणार याबाबत कोणतीही स्पष्टता त्यांनी केलेली नाही. दरम्यान मनसे सोडताना वसंत मोरे यांना अश्रू अनावर झाले होते. अमित ठाकरे यांनी मोरे यांना जाब विचारला होता, त्यावरून ते नाराज असल्याचं म्हटलं जातंय.

अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे विद्यापीठावर यशस्वी मोर्चा काढण्यात आला होता. अमित ठाकरे यांनी वसंत मोरे यांना कुठे दिसला नाहीत, अशी विचारणा केली होती. तेव्हापासूनच वसंत मोरे नाराज असल्याची चर्चा होती. ज्यावेळी वसंत मोरे यांनी मनसेला सोडलं तेव्हा ते म्हणाले की, राज साहेब ठाकरे २५ वर्षात कधीही बोलले नाही, मात्र अमित ठाकरे बोलले. वसंत मोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर आपल्या मनातलं आज बोलून दाखवलं.

अविनाश जाधव यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे वसंत मोर यांच्यावर टीका केली होती. एक राजा रोज हत्तीवरून राज्यात फेरफटका मारत असायचा. तेव्हा प्रत्येक चौकात राजाचं औक्षण केलं जायचं, आरती ओवाळली जायची, राजाचं स्वागत केलं जायचं. तेव्हा त्या हत्तीला वाटायचं आपलंच औक्षण आणि आरती केली जात आहे. त्याला कळत नव्हतं की ही सगळी राजाची पुण्याई आहे. राजामुळे त्याला हा मान मिळत आहे, अशा शब्दात अविनाश जाधव यांनी वसंत मोरे यांच्यावर निशाणा साधला होता असं म्हटलं जातं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

नाशिक, अमरावतीनंतर यवतमाळमध्येही लव्ह जिहाद? 'यवतमाळमध्ये 34 अल्पवयीन मुली बेपत्ता'

SCROLL FOR NEXT